Goa Mine: लीज भागातील निवासी घरे, मंदिरांचे भवितव्य काय? खाणग्रस्त शेतकरी एकवटले

गावकऱ्यांना 600 पानांचा तांत्रिक अहवाल सोपा करून समजावून सांगण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत
Goa Mine
Goa MineDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mine मुळगाव, मये, शिरगाव, लामगाव, बोर्डा आणि डिचोली या सहा क्षेत्रांवरील इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल स्पष्ट न केल्याने खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भविष्यात खाणकाम सुरू होण्याची शक्यता असलेल्या लीजवरील भागात दर्शविलेली निवासी घरे, मंदिरे यांचे भवितव्य काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

बुधवारी (ता.९) मये, डिचोली, मुळगाव, शिरगाव आणि लामगाव या खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या गटाने आझाद मैदान पणजी येथे या भागातील खाण उपक्रम घाईघाईने सुरू करण्यामागच्या विषयावर माध्यमांशी संवाद साधला.

Goa Mine
Goa MLA Salary Hike: आमदारांची चांदीच चांदी, वेतनासह पेन्शनमध्येही भरीव वाढ

पत्रकारांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते आणि मुळगावचे रहिवासी स्वप्नेश शेर्लेकर यांनी गोव्यातील ४० ग्रामपंचायतींमध्ये ठेवण्यात आलेल्या इम्पॅक्ट असेसमेंट अहवालावरील जनसुनावणी सरकारने घाईघाईने हाती घेतल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुळगाव, मये, शिरगाव, लामगाव, बोर्डा आणि डिचोली या सहा भागांतील गावकऱ्यांना ६०० पानांचा तांत्रिक अहवाल सोपा करून समजावून सांगण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Goa Mine
Bicholim Sesa Mine: जनसुनावणीपूर्वीच कामगारांच्या भवितव्याचा निर्णय घ्या, ‘सेझा’चे ‘ते’ कामगार आक्रमक

खाण लीज 50 वर्षांसाठी आहे आणि ज्या खासगी कंपनीला लीज मिळाले आहे ते खाणकाम करतील; पण त्या लीज क्षेत्रात 100 पेक्षा जास्त घरे आणि काही मंदिरे दाखवली आहेत. या घरांचे आणि मंदिरांचे भवितव्य काय असेल, हे सरकारने आम्हाला समजावून सांगण्याची गरज आहे.

- स्वप्नेश शेर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com