Goa MLA Salary Hike: आमदारांची चांदीच चांदी, वेतनासह पेन्शनमध्येही भरीव वाढ

राज्य मंत्रिमंडळाची मान्यता : वाहन खरेदीसाठी मिळणार अतिरिक्त 25 लाख रुपये
Goa MLA Salary
Goa MLA SalaryDainik Gomantak
Published on
Updated on

Goa MLA Salary Hike आमदार-मंत्र्यांच्या भत्त्यांमध्ये घसघशीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. गोवा वेतन व निवृत्ती वेतन कायद्यात दुरुस्ती करून ही वाढ लागू केली जाणार आहे.

विधानसभा अधिवेशन सुरू असतानाचा वास्तव्य भत्ता प्रतिदिन ३ हजार रुपयांवरून चार हजार रुपये करण्यात येणार आहे. तसेच गोव्याबाहेर वास्तव्यासाठी महिन्याकाठी साडेसात हजार रुपयांची तरतूद होती, ती आता दिवसाला 12 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे.

Goa MLA Salary
Accident On Banastarim Bridge: मेघनाला वाचवण्यासाठी पोलिसांची ‘सेटिंग’? कारवाईत चालढकल होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

यापूर्वी आमदार-मंत्र्यांना वाहन खरेदीसाठी कर्जमर्यादा 15 लाख रुपये होती, ती आता 40 लाख रुपये करण्यात येणार आहे. घर बांधणीसाठीची कर्जमर्यादा 30 लाख रुपयांवरून 45 लाख रुपये करण्यात येणार आहे.

300 वरून आता 500 लीटर पेट्रोल मोफत

यापूर्वी आमदारांना प्रत्येक महिन्याला 300 लीटर पेट्रोल मोफत देण्यात येत होते. यापुढे प्रतिमहा 500 लीटर पेट्रोल मोफत देण्यास येणार आहे.

शिवाय आमदारांना आपल्या कार्यालयात एक खासगी सचिव, एक कारकून (एलडीसी), एक शिपाई, एक चालक असे पाच कर्मचारी नेमण्यास मिळत होते. यापुढे आणखी एक एलडीसी आणि एक खासगी साहाय्यक असे मिळून सात कर्मचारी नेमण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Goa MLA Salary
Illegal Mining In Goa: बेकायदा खाण महसूल नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांचे धक्कादायक विधान; विरोधकांची आक्रमक भूमिका

वैद्यकीय बिलांतही सवलत : सभापतींना आमदार-मंत्र्यांची 3 लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय बिले मंजूर करण्याचा अधिकार आहे, तो आता 5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे.

कामत यांची मागणी धसास

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिगंबर कामत यांनी आमदारांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारांचे वेतन तसेच पेन्शनमध्ये सरकारकडून वाढ झाली नसल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले होते. अखेर त्यांची मागणी आज पूर्ण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com