Goa Millet Cultivation: बार्देश तालुक्यात 2.5 हेक्टर जमिनीवर बाजरीची लागवड

पथनाट्यातून बाजरीच्या महत्वाविषयी जागरूकता
Goa Millet Cultivation
Goa Millet CultivationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Millet Cultivation: गोव्यात गेल्या काही काळात राज्य सरकारकडून नाचणी, बाजरी लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. बार्देश तालुक्यात प्रादेशिक कृषी कार्यालयाच्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात बाजरीची लागवड करण्यात आली आहे.

तालुक्यात प्रथमच बाजरी लागवडीखालील क्षेत्र 2.5 हेक्टरपेक्षा जास्त आहे. दरम्यान, रब्बी हंगामात अधिक क्षेत्र बाजरीच्या लागवडीखाली आणण्याचे नियोजन आहे.

बार्देश तालुक्यात मोईरा थिवी आणि इतर भागातील शेतकऱ्यांनी नाचणी आणि बाजरीची लागवड केली आहे. याशिवाय, अनेकांनी किचन गार्डनमधूनही बाजरी पिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

Goa Millet Cultivation
Goa Land Grab Scam: जमिन हडप प्रकरणांची चौकशी पूर्ण; 200 हून अधिक याचिका, 100 हून अधिक मालमत्तांची तपासणी...

दरम्यान, नुकतेच म्हापसा येथील सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजरीवरील पथनाट्याचे सादरीकरण केले. यातून बाजरी पिकाबाबत जागृती केली जात आहे.

सर्वसामान्यांमध्ये बाजरीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने, कृषी विभाग, AATMA नॉर्थने सेंट झेवियर्स कॉलेज, म्हापसा यांच्या सहकार्याने या पथनाट्याचे आयोजन केले होते.

यात 14 विद्यार्थ्यांच्या गटाने बाजरीचे महत्त्व, त्याचे फायदे सांगितले. विविध ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com