Mhadei Sanctuary: म्हादई अभयारण्याला गैरप्रकारांचा विळखा! बसवेश्वर मंदिरात तोडफोड, आगीच्या घटना; कडक कारवाईची होतेय मागणी

Mhadei Sanctuary Problems: सत्तरी तालुक्यात १९९९ साली म्हादई अभयारण्य घोषित झाल्यानंतर अनेक निर्बंध आलेले आहेत. म्हादई अभयारण्य हा सत्तरी तालुक्याचा श्वास आहे.
Goa Forest
Mhadei SanctuaryDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यात १९९९ साली म्हादई अभयारण्य घोषित झाल्यानंतर अनेक निर्बंध आलेले आहेत. म्हादई अभयारण्य हा सत्तरी तालुक्याचा श्वास आहे. या क्षेत्रात पर्यावरणाबाबत अनेक गोष्टींच्या संवर्धनाची गरज आहे. म्हादई अभयारणात गेल्या काही वर्षांपासून गैरप्रकार सुरू आहेत. ते रोखणे ही सरकारची जबाबदारी बनली आहे.

काही दिवसांपूर्वी निर्मनुष्य म्हादई अभयारण्य क्षेत्रातील झाडांनी गावातील बसवेश्वर मंदिरात अज्ञातांकडून सामानाची तोडफोड केल्याची घटना समोर आली होती. या ठिकाणी कोणी वास्तव्य करीत नाहीत. लोक येऊन जाऊन असतात. या घटनेने शिवभक्तांकडून मोठा संताप व्यक्त करण्यात आला.

या बसवेश्वर मंदिरातच बाहेरील जागेत अज्ञातांनी आग लावली होती. तसेच मंदिरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही जाळून टाकले होते. मंदिराबाहेर व्हरांड्यात टाईल्स ठेवल्या होत्या. त्याही फोडल्या होत्या. तिथे असलेले चिरेही अस्ताव्यस्त टाकले होते. तसेच परिसरात सुक्या गवताला आग लावली होती. मंदिरातील कपाट फोडून त्यातील सामान काढून विस्कटून टाकले होते. सर्व सामानाची नासधूस करून एकप्रकारे मंदिराची विटंबना करण्यात आलेली होती. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

Goa Forest
Mhadei Wildlife Sanctuary: म्हादई अभयारण्यातील ट्रेकर्स हवालदिल; तीन महिन्यांपासून खिशात पगार नाही!!

आता उन्हाळ्यात काही लोकांची भ्रमंती म्हादईच्या परिसरात सुरू असते. म्हादई नदीत आंघोळीसाठी लोक जात असतात. तसेच मग बसवेश्वर मंदिरालाही ते भेट देतात. असेच काही लोक तिथे गेले असता ही घटना उघडकीस आलेली आहे. हे कृत्य कोणी केले हे समजलेले नाही. हे जाणून बूजून मुद्दामहून केल्याचा अंदाज लोकांनी काढला आहे.

Goa Forest
Sanctuaries In Goa: या उन्हाळी सुट्टीत करा सफर गोव्यातल्या अभयारण्यांची! कसे जाल, काय पहाल; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

अभयारण्यात कडक निर्बंधांची गरज

म्हादई नदी व जंगलाच्या परिसराला निसर्गसंपदेचा वास आहे. पट्टेरी वाघ, ब्लॅक पँथर, वनमानव अशा विविध वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या म्हादई अभयारण्यात अज्ञातांकडून गैरप्रकार केले जात आहेत. ते रोखण्यासाठी वन विभागाकडून कडक कारवाईची गरज आहे. यासाठी लोकांवर नियम अटी लादून निर्बंध घालणे हाच उपाय आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com