Mhadei Sanctuary: पूर्वजांनी राखलेले, बारमाही धबधब्यांनी सजलेले, पट्टेरी वाघांमुळे समृद्ध झालेले सत्तरीचे वैभव 'म्हादई जंगल'

Mhadei Wildlife Sanctuary: निसर्ग सौंदर्याचा मनमोहक नजराणा असलेल्या या म्हादईच्या जंगलातील वृक्ष, वेली यांनाही खूप महत्व आहे.
Mhadei Wildlife Sanctuary, Goa Jungle
Goa JungleX
Published on
Updated on

पद्माकर केळकर

सत्तरी तालुक्याला समृद्ध इतिहास आणि घनदाट जंगलाचे कवच आहे. १९९९ साली जाहीर झालेल्या म्हादई अभयारण्यात वैविध्यपूर्ण जैव संपत्तीचा खजिनाच दडलेला आहे. प्राण्यांनी भरपूर असलेल्या या अभयारण्यात पट्टेरी वाघ, बिबटा, काळा वाघ, वन मानव, पशु, पक्षी, पुरातन मंदिरे आदींचे अस्तित्व आहे.

निसर्ग सौंदर्याचा मनमोहक नजराणा असलेल्या या म्हादईच्या जंगलातील वृक्ष, वेली यांनाही खूप महत्व आहे. काही अंशी मानवाचे जीवनदेखील त्यावर अवलंबून आहे.

आपले पुर्वजांनी अतिशय नियोजनबध्दपणे या निसर्गरम्य जंगलाचे संवर्धन केले आहे- जंगलाचा काही भाग देवाच्या नावाने राखून ठेवला गेला. देवाची राय नावाने अशी स्थाने प्रचलीत आहेत. बांबर येथील निरंकाराची राय, ब्रम्हाकरमळी येथील राय प्रसिद्ध आहे.

करंझोळ, कुमठळ यासारखी गावे म्हादई अभयारण्याच्या पायथ्याशी वसलेली आहेत. या करंझोळ गावच्या जवळ असलेल्या डोंगराला हुळणेश्वर नावाने जपलेला आहे. पुर्वीच्या काळी लोकांनी कुमेरी शेती करुनही हे डोंगर राखले गेले आहेत.

म्हादईत पट्टेरी वाघ आहे याचा प्रत्यक्षदर्शी छायाचित्रांचा पुरावा मागील बारा वर्षात अनेकवेळा रानात बसवलेल्या कॅमेर्‍यात बंदिस्त झालेला आहेत. साट्रे गावातील म्हादईच्या हिरव्यागार वनराईत कॅमेर्‍यात मादी पट्टेरी वाघ व सोबत दोन वाघिणीची दोन बछडी टिपली गेली होती.

Mhadei Wildlife Sanctuary, Goa Jungle
Sanctuaries In Goa: या उन्हाळी सुट्टीत करा सफर गोव्यातल्या अभयारण्यांची! कसे जाल, काय पहाल; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

२०१३ साली सर्वात पहिलांदा पट्टेरी वाघ कॅमेर्‍यात बंदीस्त झाला होता. व त्यातुन वाघांचे वास्तव्य समोर आले होते. याची दखल घेत गोवा सरकारने प्राणी शास्त्रज्ञ डाँ. उल्हास कारंथ यांना पाचारण केले होते. त्यानंतर २०१५ साली पुन्हा पट्टेरी वाघाचे दर्शन कॅमेर्‍यात झाले होते.

२३ मे २०१६ साली काळा वाघ दिसला होता. २०१७ साली साट्रे गावच्या जंगलात तब्बल पाच वाघ नजरेस आले होते. २०२० साली गोळावलीत चार पट्टेरी वाघ निदर्शनास आले होते. वनमानव, अस्वल, पाक मांजर, खवले मांजर, चौशिंगा, मेरु, पिसय, आदी वन्यप्राणी दिसले आहेतच.

Mhadei Wildlife Sanctuary, Goa Jungle
Mhadei Sanctuary: म्हादई अभयारण्याला गैरप्रकारांचा विळखा! बसवेश्वर मंदिरात तोडफोड, आगीच्या घटना; कडक कारवाईची होतेय मागणी

झाडानी या म्हादई क्षेत्रात बसवेश्वर शिवशंभुंचे शिवलिंग मंदिर आहे. १९९९ साली अधिसुचीत केलेल्या म्हादई अभयारण्य हा वाघांचा पुर्वांपार नैसर्गिक अधिवास आहे. या संशोधन कार्यात म्हादई वनअधिकारी, पर्यावरण प्रेमी वर्गाचे विशेष योगदान लाभलेले आहे. सुमारे २०८ चौ.कि.लो मीटर असा म्हादई अभयारण्याचा परिसर व्यापलेला आहे.

म्हादईत वायंगिणीत बारमाही वाहणारे नैसर्गिक धबधबे आढळून येतात. गार पाणी व धबधब्याच्या वाहत्या पाण्याच्या दोन्ही बाजूने निर्माण झालेल्या सुंदर नैसर्गिक समृद्धीचा हा भाग आहे. एकूणच म्हादईच्या जंगलात वैविध्यपुर्ण गोष्टी पहावयास मिळतात. म्हादई क्षेत्र हे सत्तरी तालुक्याचे वैभव आहे. अशा क्षेत्रात वनविभागाच्या परवानगीने जाऊन तेथील गोष्टींची माहिती अवश्य घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com