'अनुसूचित जाती जमातीची प्रवीण आर्लेकर यांनी जाहीर माफी मागावी'

मगोचे उमेदवार आर्लेकर यांनी जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल 'डॕमोक्रेटिक पिपल फॕडरेशन'चे अध्यक्ष सुभाष केरकर यांचे पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
'डॕमोक्रेटिक पिपल फॕडरेशन'चे अध्यक्ष सुभाष केरकर जिल्हयाधिकाऱ्याना निवेदन सादर करण्यापूर्वी
'डॕमोक्रेटिक पिपल फॕडरेशन'चे अध्यक्ष सुभाष केरकर जिल्हयाधिकाऱ्याना निवेदन सादर करण्यापूर्वी Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: पेडणे मतदारसंघाच्या मगो पक्षाचा उमेदवार 'प्रवीण आर्लेकर' (MGP Candidate Pravin Arlekar) यांनी जातीवाचक (Racist) शब्द वापरल्याबद्दल 'डॕमोक्रेटिक पिपल फॕडरेशन'चे (Democratic People's Federation) अध्यक्ष तसेच शिवसेना उपराज्यप्रमुख आणि 'युगनायक' संस्थेचे माजी अध्यक्ष सुभाष केरकर (Subhash Kerkar) यांच्यातर्फे पेडणे उपजिल्हाधिकारी (Pernem SDM) यांना निवेदन देऊन प्रवीण आर्लेकर यांना समज द्यावा, आणि त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष केरकर यांनी केली आहे.

'डॕमोक्रेटिक पिपल फॕडरेशन'चे अध्यक्ष सुभाष केरकर जिल्हयाधिकाऱ्याना निवेदन सादर करण्यापूर्वी
'कोरगावच्या चार पंच सदस्यांनी पाठीत सुरा खुपसला'

सुभाष केरकर यांनी सोमवारी पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी राजेश आजागावकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गोवा विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे पेडणे या राखीव मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी अनेकजण पुढे येत असून मगो पक्षाचे उमेदवार प्रवीण आर्लेकर हे स्वतः अनुसूचित जातीतील असून एका वाड्यावर जाऊन त्यांनी "महारवाडा" असा शब्दप्रयोग वापरला. हा शब्द वापरण्यास कायद्याने बंदी आहे. आपण अनुसूचित जातीतील असल्याने पेडणे उपजिल्हाधिकारी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस आणि त्यांना ताकित द्यावी, अशी मागणी केली आहे.

'डॕमोक्रेटिक पिपल फॕडरेशन'चे अध्यक्ष सुभाष केरकर जिल्हयाधिकाऱ्याना निवेदन सादर करण्यापूर्वी
वास्कोतील पालिका बालोद्यान विकासापासून दूर

प्रवीण आर्लेकर यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा ते ज्या ज्या वाड्यावर निवडणुकीच्या काळात जातील तिथं त्यांना जाब विचारला जाणार, पेडणे मतदार संघातील अनुसूचित जाती समाजाचा विकास झाला नाही, हे आर्लेकर यांना 20 वर्षात कधी दिसले नाही, आताच त्यांना भास झाला की काय, असा सवाल करून केरकर यांनी संताप व्यक्त करून जातीवाचक शब्दाचा प्रयोग त्यांनी थांबवावा, शिवाय मगो पक्षाने त्यांना ताकीत द्यावी व अभ्यास करून विधाने करावीत, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com