Goa: कोरगाव पंचायतीच्या (Korgao) चार पंच सदस्यांनी आपापली कामे माझ्याकडून करून घेतली, त्यात लँड माफिया (Land mafia) सारख्यांचा समावेश आहे, अश्यानी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपली साथ सोडून पाठीत सुरा खुपसला, अश्या मतलबी पंच सदस्यांना पुन्हा आपल्या गटात कधीच घेणार नसल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar) यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले.
24 ऑक्टोबर रोजी कोरगाव येथे 'मिशन फॉर लोकल'चे (Mission for Local) राजन कोरगावकर (Rajan Korgaokar) यांनी आपल्याला भाजपाची उमेदवारी पेडणे मतदार संघातून मिळावी, यासाठी शक्ती प्रदर्शन केले होते. त्यावेळी कोरगावचे जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर हे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे कट्टर समर्थक असलेले, त्यांच्या सहित पंच सदस्य उदय पालयेकर, कुस्तान कुयेलो, पंच अब्दुल नाईक, पंच उदय देसाई, पंच महादेव पालयेकर यांनी राजन कोरगावकर यांच्या सभेला व्यासपीठावर उपस्थित राहून त्याना पाठींबा दिला. त्यामुळे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची पाच सदस्यांनी साथ सोडली, त्यावर आजगावकर भाष्य करत होते.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोलताना लँड माफियांनी आपल्या जमिनींचे व्यवहारही आपल्याकडून करून घेतले, ते स्वार्थी होते, त्याना जनताच जाब विचारेल, असा दावा आजगावकर यांनी केला.
माजी सरपंच स्वाती गवंडी यांच्यावर अन्याय
कोरगाव पंचायत मंडळ स्थापन झाल्यानंतर सरपंचपद हे महिलासाठी आरक्षित असल्याने प्रमिला देसाई आणि स्वाती गवंडी या दोन महिला पंच सदस्यना अडीच अडीच वर्षे सरपंच पद विभागून देण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या उपस्थितीत अलिखित करार झाला होता. स्वाती गवंडी यांनी सरपंच पदाचा आपला काल पूर्ण करण्या आगोदारच आठ पंच सदस्यांनी अविश्वास ठराव आणून तिला खाली खेचले. या विषयी बाबू आजगावकर याना विचारले असता आपल्याला खूप वाईट वाटले होते, मधेच तिला उतरले म्हणून आपण आठही पंच सदस्यांकडे बोललो मात्र ते एकायला तयार नव्हते, त्याना त्याचे इप्सित सध्या करायचे होते, म्हणून ते शब्दाला जागले नाही, असा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केला.
तरीही स्थानिक उमेदवाराला नाकारले?
'मिशन फॉर लोकल'चे राजन कोरगावकर हे स्थानिक उमेदवार असल्याने कोरगावच्या पाच पंच सदस्यांनी त्याना पाठींबा दिला त्यावर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले यापूर्वी देवू मांद्रेकर, धारगळकर, कांता जाधव, पेडणेकर हे स्थानिक उमेदवारच होते, त्याना मतदारांनी का नाकारले असा प्रश्न उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केला.
पंच सदस्यांचा काय परिणाम होईल?
कोरगावच्या पाच पंच सदस्यांनी तुमची साथ सोडल्याने त्याचा आगामी निवडणुकीत तुमच्यावर काय परिणाम होईल, असा प्रश्न विचारला असता उत्तर देताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले की, 'ते पाच गेले तरी आपल्यासोबत चार आहेत, मतदार हेच आपले देव आहेत, तेच आपल्याला विजयी करतील, असा आजगावकर यांनी विश्वास व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.