Goa Monsoon 2023: पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी; सखल भागात पूरजन्य स्थिती, धोका वाढला

ऑरेंज अलर्ट : तिलारीतून विसर्ग सुरू
Flooding conditions
Flooding conditionsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023 मुसळधार पावसाने अविश्रांतपणे सुरू केलेल्या फटकेबाजीमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सखल भागांत पाणी साचल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून रात्रभर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदीकाठच्या लोकवस्तीला धोका निर्माण होऊ शकतो.

अनेक ठिकाणी नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पडझड आणि नुकसानीचे सत्र सुरूच आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

चार दिवस सतर्कतेचा इशारा

1. हवामान खात्याने राज्यात २६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ९०.२ मिमी. (३.५५ इंच) पाऊस पडला असून आतापर्यंत एकूण २०१० मिमी. म्हणजेच ७९.१३ इंच पाऊस पडला.

2. पर्जन्यमान असेच राहिले तर पाऊस लवकरच इंचांचे शतक पूर्ण करण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

डिचोलीत पूरसदृश स्थिती, पंपिंग यंत्रणा सुरू; बंदरवाडा येथील रस्ता पाण्याखाली

गेल्या पाच-सहा दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या कोसळधार पावसाचा जोर आज (शनिवारी) किंचित कमी झाल्याने, डिचोलीत निर्माण झालेली पूरसदृश स्थिती नियंत्रणात आली आहे. कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर काहीसा मंदावल्याने तूर्तास पुराचा धोका टळला आहे.

त्यामुळे जनतेनेही सुटकेचा श्वास घेतला असला, तरी अजूनही जनता भयमुक्त झालेली नाही. नदी बाहेर पसरलेले पाणी पंपिंगद्वारे नदीत सोडणे सुरू आहे.

Flooding conditions
Goa Crime News: पूर्वाश्रमीच्या पत्नीसह अल्पवयीन मुलीला केली मारहाण; वकीलावर गुन्हा दाखल

दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्याने डिचोली शहरातील बंदरवाडा आदी भागात घुसलेले पाणी हळूहळू ओसरत आहे. दरम्यान, दिवसभराच्या तुलनेत आज सायंकाळी पावसाचा जोर जरा वाढला होता, तरी स्थिती नियंत्रणात होती.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून कहर केलेल्या पावसाने काल अक्षरशः रौद्रावतार धारण करताना सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ''कोसळधार''ने डिचोलीत हाहा:कार उडाला होता.

पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. बहुतेक भागात जलमय चित्र दिसून येत आहे. कोसळधार पावसामुळे काल सायंकाळपर्यंत डिचोलीसह अन्य नद्यांनी धोक्याची पातळी पार केली होती.

मध्यरात्री तर नदीचे पाणी बाहेर फुटल्याने शहरातील बंदरवाडा आदी सकल भागात जलमय स्थिती निर्माण झाली होती. बंदरवाडा येथे तर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.

आज सकाळी दहा वाजेपर्यंत रस्ता पाण्याखाली होता. त्यामुळे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या जनतेला पाण्यातून वाट शोधावी लागली. वाहनचालकांवरही तोच प्रसंग आला होता.

Flooding conditions
Dudhsagar Waterfall: ‘दूधसागर’च्या दर्शनाची प्रतीक्षा आणखी लांबली, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला 'हा' आदेश

काणकोण परिसरातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले!

खोतीगावातील निर्जन अशा नडके, केरी वाड्यावरील नाले, नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पालकांना आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन नाला ओलांडून मुलांना शाळेत पोचवावे लागत आहे. गोवा मुक्त होऊन साठ वर्षे झाली, मात्र या वाड्यांना पावसाळ्यात अद्याप कनेक्टिव्हिटी नाही.

त्यामुळे या वाड्यांचा इतर उर्वरित खोतीगावशी संपर्क तुटतो. केरी व नडके येथे सुमारे दोनशे रहिवासी वास्तव्य करून आहेत तिथे सुमारे एकवीस शाळकरी मुले आहेत.

या नदीवर 23 लाख रुपये खर्चून माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या कार्यकाळात पूल बांधण्यात येणार होता. सर्व सोपस्कारही पूर्ण झाले होते, निविदा जाहीर झाल्यानंतर कंत्राट घेतलेल्या कंत्राट दाराने असमर्थता दाखविल्याने कामाची फेर‌‌ निविदा काढण्यात आली, अशी माहिती माजी सरपंच दया ऊर्फ उमेश गावकर यांनी दिली.

सरपंच आनंदू देसाई म्हणाले, पक्का पूल उभारण्यात येणार सध्या तात्पुरती व्यवस्था म्हणून सभापती रमेश तवडकर यांच्या प्रयत्नातून लोखंडी पूल उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com