Dudhsagar Waterfall: ‘दूधसागर’च्या दर्शनाची प्रतीक्षा आणखी लांबली, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला 'हा' आदेश

पर्यटक, ट्रेकर्सना पूर्णतः बंदी : दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; केवळ पायथ्याचे दर्शन
Goa Waterfall |dudhsagar waterfall
Goa Waterfall |dudhsagar waterfallDainik Gomantak
Published on
Updated on

Dudhsagar Waterfall दूधसागर धबधबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने या धबधब्यावर येण्यास पर्यटक आणि ट्रेकर्सना पूर्णत: बंदी घालण्याचा आदेश आज दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी जारी केला. त्यामुळे दूधसागर धबधब्याची सैर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटक, ट्रेकर्सना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मैनापी धबधब्यावर दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. तसेच गेल्या रविवारी अनेक ट्रेकर्स धबधब्याजवळ येऊन अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर येथे कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.

Goa Waterfall |dudhsagar waterfall
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; वाचा आजच्या किमती

तथापि, दूधसागर धबधब्याच्या पायथ्याच्या बाजूला निश्चित्त केलेल्या मार्गावरून जायला परवानगी असेल. मात्र, पर्यटकांना वन विभागाच्या नियमांचे पालन करावे लागेल. कुळे, कॅसल रॉक, सोनावली, करंझोळ या चारही ठिकाणी चेक पोस्ट उभारले जातील.

येथे पोलिस, रेल्वे पोलिस, वन कर्मचारी असतील. येथून प्रवेश बंद असेल. या चारही ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे सीसीटीव्ही लावले जातील. त्याद्वारे निगराणी केली जाईल. दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाला रेल्वे पुलावर कुंपण घालण्याचा आदेश दिला असून धबधब्यावर बंदीबाबत इंग्रजी, मराठी, कोकणी, कन्नड, हिंदी भाषांमध्ये फलक लावले आहेत.

नियमांचा भंग केल्यास किंवा कर्मचारी, अधिकारी यांच्याशी हुज्जत घातल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

Goa Waterfall |dudhsagar waterfall
Goa Congress : लोकसभेच्या दृष्टीने काँग्रेसची स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी

कुळे, मोलेवासीयांकडून स्वागत

दूधसागर धबधब्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश काढला आहे, त्याचे कुळे व मोले येथील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. जून महिन्यात दूधसागर धबधब्यावर जाण्याकरिता बंदी होती, तरीही मोठ्या संख्येने पर्यटक रेल्वेतून धबधब्यापर्यंत जात होते.

काही दिवसांपूर्वीच मैनापी धबधब्यावर दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्या रविवारी दूधसागरकडे येणारे अनेक पर्यटक आणि ट्रेकर्स येथे येऊन अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर येथे कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरिता दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दूधसागर धबधब्यावर ट्रेकर्स, पर्यटकांना बंदी घातली आहे.

Goa Waterfall |dudhsagar waterfall
LLB Admission Scam: साबा दा सिल्वा पूर्णत: दोषीच! आता लक्ष कारवाईकडे

याठिकाणी प्रवेश निषिद्ध : दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या आदेशात दूधसागर धबधबा, दूधसागर रेल्वे स्टेशन, दूधसागर धबधब्याजवळील रेल्वे पूल येथे पर्यटक, ट्रेकर्स आणि इतरांना पूर्णतः बंदी असेल. पोलिस, रेल्वे कर्मचारी, वन कर्मचारी आणि सरकारी अधिकाऱ्यांशिवाय येथे कुणालाही जाता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com