Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa GMC Deaths: प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, तसेच जिल्‍हा-उपजिल्‍हा इस्‍पितळांतून गोमेकॉत स्‍थलांतरित करीत असताना गेल्‍या साडेचार वर्षांत ८८ रुग्‍णांचा वाटेतच मृत्‍यू झाला.
GMC Task Force
GMC Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, तसेच जिल्‍हा-उपजिल्‍हा इस्‍पितळांतून गोमेकॉत स्‍थलांतरित करीत असताना गेल्‍या साडेचार वर्षांत ८८ रुग्‍णांचा वाटेतच मृत्‍यू झाला.

आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत विधानसभेत विचारलेल्‍या लेखी प्रश्‍नाला आरोग्‍यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्रांतून गोमेकॉत नेताना ४९, तर जिल्‍हा-उपजिल्‍हा इस्‍पितळांतून गोमेकॉत नेत असताना ३९ रुग्‍णांचा वाटेतच मृत्‍यू झाल्‍याचे सांगत, त्‍यासंदर्भातील आकडेवारीही मंत्री राणे यांनी सादर केली आहे.

GMC Task Force
Goa GMC Issue: "तू मंत्र्यांचो चमचो" आंदोलक डॉक्टरांचा डीनविरोधात भडका; हमरीतुमरीमुळे CM सावंतही झाले अवाक!

दर महिन्‍याला घेण्‍यात येणाऱ्या ऑडिट बैठकीत गोमेकॉत आणताना वाटेत होत असलेल्‍या मृत्‍यूंबाबत चर्चा केली जाते. गंभीर रुग्‍णांना तत्‍काळ गोमेकॉत दाखल करण्‍यासाठी रुग्‍णवाहिकाही उपलब्‍ध करून दिल्‍या जातात, असेही राणे यांनी म्‍हटले आहे.

GMC Task Force
Goa GMC: गोव्याचे शिस्तप्रिय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, चुकार डॉक्टरांना त्यांचा एक शेरा पुरे असायचा; गोमेकॉतील नाट्य

४९ - प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्रांतून गोमेकॉत नेताना वाटेतच मृत्‍यू

३९ - जिल्‍हा-उपजिल्‍हा इस्‍पितळांतून गोमेकॉत नेत असताना वाटेतच मृत्‍यू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karnataka Tourist Death Case
Drowning Death
GMC cardiology department staff protest
Bison Attack Death Betoda Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com