Maza Flat Scheme: 'माझा फ्लॅट' योजना सुरक्षित! गोव्यातील 50 हजार नागरिकांना दिलासा, आता फ्लॅटची कायदेशीर मालकी मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maza Flat Ownership Rights: तीन वेगवेगळ्या कायद्यांत दुरुस्ती करून सरकारने ‘माझा फ्लॅट’ योजना सुरू केली आहे.
Maza Flat Ownership Rights
Maza Flat SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: तीन वेगवेगळ्या कायद्यांत दुरुस्ती करून सरकारने ‘माझा फ्लॅट’ योजना सुरू केली आहे. त्यामुळे या योजनेला कुणीही न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही. राज्यातील सुमारे ५० हजार नागरिकांना या योजनेचा फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

सहकार खात्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘माझा फ्लॅट’ योजनेच्या जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, सचिव संदीप जॅकीस, सहकार निबंधक आशुतोष आपटे उपस्थित होते.

Maza Flat Ownership Rights
Goa New Taxi Rules: टॅक्सी व्यवसायाला मोठा धक्का! आता चालकासह कारही मिळणार भाड्याने; केंद्र सरकारचा नवा नियम

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत असताना सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांनी फ्लॅट विकत घेतले असले, तरी त्यांची कायदेशीर मालकी मिळाली नसल्याची खंत व्‍यक्त केली होती. या समस्येचा गांभीर्याने विचार करून ‘माझे घर’ योजनेच्या धर्तीवर ‘माझा फ्लॅट’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून अशा नागरिकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्टँप ड्युटी, नोंदणी शुल्क जुन्या दरानेच

फ्लॅटची मालकी मिळवून देण्यासाठी जमीनमालक आणि बिल्डरांना योजनेनुसार तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या काळात संबंधितांनी फ्लॅट नावावर करून न दिल्यास सरकारमार्फत नागरिकांना ‘सेल डीड’ करून देण्यात येईल. २० वर्षांपूर्वी बांधलेल्या सोसायट्यांतील फ्लॅट नावावर करताना, सोसायटी बांधली त्या वेळचेच स्टँप ड्युटी आणि नोंदणी शुल्क आकारले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या माध्यमातून मिळविता येईल मालकी

राज्यातील सुमारे ५० हजार नागरिकांना ‘माझा फ्लॅट’ योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सोसायट्यांमध्ये फ्लॅट खरेदी करूनही कायदेशीर मालकीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या योजनेतून दिलासा मिळणार आहे. जमीनमालक किंवा बिल्डर सहकार्य करत नसल्यास सरकारच्या माध्यमातून मालकी मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

Maza Flat Ownership Rights
Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

आत्तापर्यंत ११ इमारतींकडून अर्ज सादर

‘माझा फ्लॅट’ योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहकार खात्याकडे ११ इमारतींकडून अर्ज आले आहेत. यावरून योजनेची राज्यभर जनजागृती होत असल्याचे दिसते. फ्लॅटची मालकी मिळाली नसलेल्या इतर सोसायट्यांनीही जमीनमालक किंवा बिल्डर तयार नसल्यास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. योजनेअंतर्गत फ्लॅट नावावर झाल्यानंतर संबंधित सोसायट्यांना इमारतीची दुरुस्ती किंवा नव्याने बांधकाम करता येणार आहे.

सहकार खात्याची कार्यालये शनिवारीही राहणार सुरू

‘माझा फ्लॅट’ योजनेसाठी नागरिकांना अर्ज करता यावेत, यासाठी सहकार खात्याची कार्यालये यापुढे दर शनिवारीही सुरू राहणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आली असून, प्राप्त अर्जांवर प्रक्रिया करून त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.