Goa Inland Waterways: गोव्याच्या सागरी विकासाला मिळणार गती; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्यात दिल्लीत महत्त्वाची बैठक!

Goa Maritime Infrastructure Development Meeting: गोव्याच्या सागरी पायाभूत सुविधांचा विकास आणि किनारी भागांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा आज दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला.
Goa maritime development project
Goa maritime development projectDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या सागरी पायाभूत सुविधांचा विकास आणि किनारी भागांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा आज दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीत गोव्यातील सागरी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.

केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी समाजमाध्यमांवर या बैठकीची माहिती देताना, गोव्याच्या किनारी विकासाला गती देण्यासाठी विविध प्रकल्प आणि योजनांवर चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच बंदरे, जलवाहतूक आणि किनारी भागाशी संबंधित सुविधा अधिक आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. गोव्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा आणि समुद्री क्षमतेचा विकासासाठी प्रभावीपणे उपयोग करण्याबाबतही या बैठकीत विचारविनिमय झाला.

Goa maritime development project
धर्म अन् अंतर्गत वादांमुळे प्रादेशिक पक्ष संपणे घातक! आरजीतील घडामोडींवर CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया

राज्याच्या आर्थिक प्रगतीत सागरी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असून, पर्यटन, जलवाहतूक, मत्स्यव्यवसाय आणि किनारी व्यापार यांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले. आगामी काळात गोव्यात सागरी पायाभूत सुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Development Exhibition
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa Cabinet Expansion Updates
Goa Traffic Fines
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com