धर्म अन् अंतर्गत वादांमुळे प्रादेशिक पक्ष संपणे घातक! आरजीतील घडामोडींवर CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया

CM Pramod Sawant RGP Crisis Statement: आरजी पक्ष अंतर्गत वाद आणि धार्मिक कारणांवरून बंद पडत असेल तर ही घटना गोव्यासाठी घातक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
CM Pramod Sawant RGP Crisis Statement
CM Pramod Sawant RGP Crisis StatementDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राजकारणात प्रादेशिक पक्ष महत्त्वाचे असतात मनोज परब यांनी ज्या प्रकारे तो पक्ष उभा केला ते काम सोपे नाही. त्याचे आमदार वीरेश बोरकर यांची कामगिरीही चांगली आहे परंतु त्यांच्यातील अंतर्गत वाद आणि धार्मिक कारणांमुळे फूट पडल्याचे बोलले जातेय. कोणताच पक्ष धर्म आणि जातीवर चालू शकत नाही. जर आरजी पक्ष अंतर्गत वाद आणि धार्मिक कारणांवरून बंद पडत असेल तर ही घटना गोव्यासाठी घातक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

ते कला अकादमी येथे कार्यक्रमानिमित्त आले असता माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले,आरजी पक्षाची संघटनेच्या माध्यमातून २०१६ साली कार्य सुरू केले नंतर २०१६ साली पक्षात रूपांतर झाले.

CM Pramod Sawant RGP Crisis Statement
Goa Politics: 'आरजी' निर्नायकी; वीरेशचे अद्याप मौन, पुढील सूत्रे कुणाच्‍या हाती? कार्यकर्ते संभ्रमात, नेतृत्वाबाबत गूढ वाढले

पहिल्याच निवडणूक जरी त्यांचा एक आमदार निवडून आला असला तरी १० टक्के मते मिळाली होती जी लक्षणीय होती.ज्यावेळी मनोज परब यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले त्यावेळी ढसाढसा रडले. त्यांचे अंतर्गत वाद काय आहेत याची कल्पना नाही. परंतु असा जर पक्ष संपत असेल तर ते वाईट आहे.

CM Pramod Sawant RGP Crisis Statement
Goa Fishing Ban: कुटबण जेटीवर मासेमारी बंदीबाबत कडक नियम; बोटी-जाळ्यांवर निर्बंध, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

आपल्याला कष्टाची जाणीव!

एखादा पक्ष घडविण्यासाठी, जनतेत जाऊन मते मिळविण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना मला आहे. मी देखील १९९६ पासून भाजप सारख्या राष्‍ट्रीय पक्षात कार्यरत असून पक्षासाठी काय काय करावे लागते, याची मला जाणीव आहे. परंतु अशा प्रकारे अंतर्गत वाद आणि देवदेवतांच्या विधानावरून पक्ष संपणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Congress Merger Proposal
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
RGP Goa Suspended Members
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com