Goa Bank: तब्बल 11 कोटी बँकेत पडून; मग 45 हजार खातेधारक गेले कुठे?

Goa Bank: खातेधारकांना आपल्या ठेवी परत घेण्यासाठी 31ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्‍याची मुदत दिली होती.
Goa Bank | Margao Urban Bank
Goa Bank | Margao Urban Bank Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Bank: गोवेकर खरंच इतके श्रीमंत झाले? की बँकेतील ठेवी काढण्‍याकडेही दुर्लक्ष व्‍हावे? डबघाईला आलेल्या ‘मडगाव अर्बन बँके’ने खातेधारकांची देणी फेडायची ठरवली असली तरी अजून थोडी थोडकी नव्‍हे तर 11 कोटींची रक्‍कम बँकेत पडून आहे. हे सुशेगाद खातेदार कोण, याचा आता बँक शोध घेत आहे.

‘मडगाव अर्बन बॅंके’ साठी नियुक्त केलेल्या लिक्विडेटरने खातेधारकांना आपल्या ठेवी परत घेण्यासाठी 31ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्‍याची मुदत दिली होती. परंतु, एकूण 56 हजार 635 खातेधारकांपैकी केवळ 16 हजार जणांनीच अर्ज केले.

Goa Bank | Margao Urban Bank
Goa State Bank : गोवा राज्य बॅंकेची स्थिती भक्कम; उल्हास फळदेसाई

पूर्वी ही मुदत ऑगस्ट 2022 पर्यंत होती. नंतर ती 30 सप्टेंबरपर्यंत व मागाहून 31ऑक्टोबरपर्यंत वाढविली गेली. तथापि, या वाढीव मुदतीत केवळ 150 खातेधारकांनीच अर्ज केले. आता प्रश्र्न उपस्थित होतो की, उर्वरित 45 हजार खातेधारक गेले कुठे?

  • ठेवीसाठी खातेधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही, असे अधिकारी आमोणकर म्हणाले.

  • लिक्विडेटरकडून जारी झालेल्या नोटिशीत 31ऑक्टोबरच्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

Goa Bank | Margao Urban Bank
Goa News: आता दिव्यांगांनाही लुटता येणार पर्यटनाचा आनंद
  • नंतर आलेल्या अर्जांवरही विचार होऊ शकतो. पण, सध्‍या आलेल्या अर्जांची रक्कम परत केल्यावरच.

  • दाखल अर्जांची छाननी करून रक्कम परत करण्‍याची प्रक्रिया सुरू आहे

120 कोटी केले अदा

दरम्‍यान, आतापर्यंत दहा हजार खातेधारकांचे 120 कोटी रुपये परत करण्‍यात आले आहेत. आता केवळ 600 खातेधारकांचे 30 कोटी देणे बाकी असल्याचे सूत्रांकडून समजते. यामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्यांचा समावेश आहे.

Goa Bank | Margao Urban Bank
Goa News: FDA ॲक्शन मोडवर '748' किलो काजू जप्त; 4 आस्थापनांना ठोठावला दंड!

अनेक खातेधारक अनभिज्ञ:मडगाव अर्बन बँके’त अजूनही अनेक खातेधारक आहेत, ज्‍यांना अजूनही माहीत नाही की आपली खाती या बँकेत आहेत. त्‍यामुळेच अनेकांनी दावा केला नसावा, अशीही शक्‍यता आहे.

किशोर आमोणकर, बँकेचे अधिकारी-

ज्या खातेधारकांकडून अर्ज आलेले नाहीत, त्यांची रक्कम अगदी नगण्य असू शकते. दुसरीकडे जास्तीत जास्त खातेधारक विदेशात आहेत. त्यामुळे ते अर्ज करू शकलेले नाहीत. सुमारे 45 हजार खातेधारकांनी अर्ज का केले नाहीत, याचा शोध सध्‍या आम्‍ही घेत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com