Goa News: आता दिव्यांगांनाही लुटता येणार पर्यटनाचा आनंद

Goa News: आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून दर्जा मिळालेल्या गोव्याच्या पर्यटनाचा आनंद दिव्यांगानाही घेता येईल.
Goa News | CM Pramod Sawant
Goa News | CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून दर्जा मिळालेल्या गोव्याच्या पर्यटनाचा आनंद दिव्यांगानाही घेता येईल, यासाठी राज्य सरकारच्या वतीने साधन सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन व्यवसायकांची मदत घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या वतीने 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान राष्ट्रीय स्तरावरचा खास दिव्यांगासाठीचा पर्पल फेस्त (महोत्सव) पणजीत भरवला जाणार आहे. या महोत्सवाच्या लोगोचे काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Goa News | CM Pramod Sawant
Goa Shimgotsav Festival: ''शिमगोत्सव काळात विद्यार्थ्यांना सुट्टी द्या''

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, ज्येष्ठ गायिका हेमा सरदेसाई, दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, संजय स्कूलचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा खास दिव्यांगांसाठीचा महोत्सवासाठी पाच हजारांहून अधिक प्रतिनिधी राज्यात येतील.

पणजी शहर दिव्यांगांच्या फिरण्यासाठी सुलभ आणि सुखकर होईल, या रीतीने प्रयत्न केले जातील. काही ठिकाणी कायमचे तर काही ठिकाणी तात्पुरते रॅम्प उभे केले जातील. किनाऱ्यावरही त्यांच्यासाठी विशेष सोय केली जाईल. गोवा हे जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. यापुढे ते दिव्यांगांचेही सुखकर पर्यटन स्थळ बनेल, यासाठी सरकारचे प्रयत्न असतील.

Goa News | CM Pramod Sawant
Goa News: कांदोळीतील स्विमिंगपूलमध्ये बुडून मुंबईच्या मुलाचा मृत्यू

यासाठी हॉटेल व्यवसायिकांबरोबर पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची मदत घेतली जाईल.’ यावेळी मंत्री फळदेसाई म्हणाले समाजकल्याण खात्याच्या वतीने या पर्पल फेस्तचे आव्हान स्वीकारले आहे. आता स्वयंसेवी संस्थांबरोबर नागरिकांनीही पुढे येऊन हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा.

सांकेतिक भाषेसह पदवी शिक्षण

दिव्यांगांसाठी असणारी सांकेतिक भाषा (साईन लँग्वेज) आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी पदवी शिक्षणाची स्वतंत्र सोय पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यात सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज कार्यक्रमात केली आहे. याशिवाय पर्पल फेस्त कायमस्वरूपी गोव्यात भरवला जाईल, असेही ते म्हणाले.

असे राहील महोत्सवाचे स्वरूप

दिव्यांगांच्या प्रोत्साहनासाठी हा महोत्सव आहे. यात नृत्य, संगीत, नाटक यासह अनेक कार्यक्रमांचे नियोजन आहे. यासाठी देशभरातून दिव्यांग सेलिब्रिटींसह पाच हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील. सध्या दोन हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींनी आपली नावनोंदणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com