Goa News: वादळी वाऱ्यामुळे सुपारीचे झाड घरावर कोसळले, सुदैवाने जीवीतहानी टळली; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest News Today 2 September 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News: वादळी वाऱ्यामुळे सुपारीचे झाड घरावर कोसळले, सुदैवाने जीवीतहानी टळली; वाचा दिवसभरातील घडामोडी
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याच्या अद्वैत बर्वेला बुद्धीबळ फिडे मानांकन प्राप्त

सातोडे, सत्तरी यासरख्या दुर्गम भागात राहून गोवा सरकारी अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अद्वैत संदेश बर्वे याने बुद्धीबळातील आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन (क्रमांक 1,603) प्राप्त केले. अद्वैतचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वादळी वाऱ्यामुळे सुपारीचे झाड घरावर कोसळले, सुदैवाने जीवीतहानी टळली; होंडा वडाकडे येथील घटना

होंडा वडाकडे येथे भालचंद्र पांडुरंग गावडे यांच्या घरावर सुपारीचे झाड पडून सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशमन जवानांतर्फे मदतकार्य. 60 हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश. सुदैवाने जीवीतहानी टळली.

फोंडा नगराध्यक्ष निवड प्रक्रियेत राजकीय चढाओढ सुरु, मंत्री रवींची वेगळी पसंती

फोंडा पालिकेत मूळ भाजप आणि नवे भाजप असे नगरसेवकांचे दोन उभे गट. विद्यमान नगराध्यक्ष आनंद नाईकांच्यावेळी विरेंद्र ढवळीकरांना भाजपकडून देण्यात आले होते आश्वासन. मात्र रवींचा नगरसेवक रुपक देसाईंच्या बाजूने कल. भाजप पक्षश्रेष्ठी कोणत्या नावाला कौल देणार याकडे फोंडावासियांचे लक्ष‌.

घरावर कोसळले सुपारीचे झाड, 40 हजाराचं नुकसान

होंडा वडाकडे येथील पिसुर्ले अर्बन बँकेजवळ घडलेल्या घटनेत भालचंद्र पांडुरंग गावडे यांच्या घरावर सुपारीचे झाड कोसळले. या दुर्घटनेत सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक पडलेल्या या झाडामुळे घराचा काही भाग व छप्पर यांचे नुकसान झाले. घटनास्थळी वाळपई अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे गावडे यांच्या सुमारे ६० हजार रुपयांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यात यश आले.

Accident: पाजीमळ-सांगे मार्गावर डंपर आणि बसची समोरासमोर धडक

पाजीमळ-सांगे मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. माहिती मिळाल्यानुसार, रस्त्यावरून चालणाऱ्या एका पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात डंपर आणि बस यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात प्रत्यक्षदर्शींनी पाहिला आणि त्यांनी घटनास्थळी घाबरलेल्या लोकांना मदत केली. सुदैवाने अपघातात कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Ponda: फोंडा पालिका नगराध्यक्ष निवड, दामूंनी बोलाविली बैठक

अलिखीत करारानुसार फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक ह्यांचा कार्यकाळ संपल्याने फोंडा पालिकेला नव्या नगराध्यक्ष निवडीचे वेध लागलेत. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक ह्यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांची बुधवारी खास बैठक बोलावली आहे. विरेंद्र ढवळीकर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. मात्र नव्या नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Goa Police: गोवा पोलिसांची मोठी कारवाई, चोरीला गेलेले 50 मोबाईल फोन जप्त

गोवा पोलिसांनी चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन शोधून काढत सुमारे ५० मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकाकडे परत दिले. मिळालेल्या माहितीनुसार, हे मोबाईल फोन कळंगुट, पणजी आणि अंजुना परिसरातून गायब करण्यात आले होते. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शोधमोहीम राबवत हे फोन जप्त केले. त्यानंतर औपचारिकरीत्या त्यांचे मालक ओळखून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

CM Pramod Sawant: राज्यात कोळसा हाताळणीची क्षमता वाढवली जाणार नाही - मुख्यमंत्री

राज्यात कोळसा हाताळणीची क्षमता वाढवली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. हॉस्पेट-तिनईघाट रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. मात्र, या दुपदरीकरणामागे कोळसा वाहतूक वाढवण्याचा घाट आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मुख्यमंत्री सावंत यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

Goa Accident: बाणावलीत कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

बाणावली येथे झालेल्या हिट अँड रनमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान राज वीर (रा. कार्मोणा, मूळ उत्तराखंड) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com