Mapusa Municipality: मांस कचरा भरून खुल्या जागेत उभी केली कार; परिसरात दुर्गंधी पसरल्यावर पालिकेने केली कठोर कारवाई

म्हापसा पालिकेची कठोर कारवाई : कारमालकास ठोठावला 25 हजारांचा दंड
Omni Car
Omni CarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mapusa Municipality म्हापसा येथील टेम्पो स्टॅण्डवर खुल्या जागेत ओमनी कारमध्ये मांस कचरा साठवून परिसरात दुर्गंधी पसरवल्याप्रकरणी म्हापसा पालिकेने दुकानमालक जावेद चौधरी याला तब्बल २५ हजारांचा दंड ठोठावला.

अशाप्रकारे पालिकेने कचराप्रश्‍नी कठोर कारवाई केल्याचे हे विरळा उदाहरण आहे. मात्र, यामुळे बेशिस्त कचराफेकूंना जरब बसणार आहे.

विशेष म्हणजे, म्हापसा पालिकेने एप्रिलपासून आतापर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात उघड्यावर कचरा फेकणारे किंबहुना ओला आणि सुका असा मिश्रित कचरा देणाऱ्यांवर कारवाई करीत तब्बल १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Omni Car
CM Pramod Sawant: प्रशिक्षण घेण्यासाठी नाखूश, आता कामावर हजर होण्यासही अनुत्सुक, तब्बल 'एवढ्या' जणांची नोकर भरतीकडे पाठ

उपलब्ध माहितीनुसार, हा प्रकार मंगळवारी (ता.15) सायंकाळी उघडकीस आला. म्हापसा येथील टेम्पो स्टॅण्डमध्ये एका कारमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळताच नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी पालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

तसेच, म्हापसा पोलिस आणि अग्निशमन दलालाही पाचारण केले. यावेळी उपनगराध्यक्ष विराज फडके हेही उपस्थित होते.

पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांनी कारमालक जावेद चौधरी याला शोधून काढले आणि कारमधील कचऱ्याची आसगाव पठारावर विल्हेवाट लावली. तसेच चौधरी याला २५ हजार रुपये दंड ठोठावला.

Omni Car
Biodiversity In Goa: मये प्रमाणेच 'ही' 40 गावे जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यासाठी पुढे सरसावली

मांस कचरा भरलेली गाडी सोमवारी रात्री आणून टेम्पो स्टॅण्डवर उभी केली होती. मंगळवारी सकाळी काहीजणांनी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती पालिकेला दिली. पालिका कर्मचाऱ्यांनी याच गाडीच्या ठिकाणी उघड्यावर टाकलेला कचरा उचलला होता.

मात्र, त्यांना या कारमध्ये कचरा असल्याची कल्पना आली नव्हती. मंगळवारी सायंकाळी या परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जावेद याची म्हापसा मासळी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर चिकनची तीन दुकाने आहेत, तसेच शहरात इतरत्रही त्याची दुकाने आहेत.

तीन-चार दिवसांपूर्वीचा कचरा

प्रारंभी स्टॅण्ड परिसरात दुर्गंधी कोठून येते, हे समजत नव्हते. मात्र, तपासणी केल्यानंतर जीए-०७-एफ-८८७१ या क्रमांकाच्या ओमनी कारमध्ये सहा ड्रम आणि २५ पिशव्यांमध्ये मांसाचा कचरा असल्याचे आढळले.

हा कचरा जवळपास ५०० किलो वजनाचा होता. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. हा कचरा किमान तीन-चार दिवसांपूर्वीचा असावा, असे पालिका सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Mapusa Banner Politics
Keri Goa Leopard Sighting
Goa Liquor Smuggling
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com