Biodiversity In Goa
Biodiversity In GoaDainik Gomantak

Biodiversity In Goa: मये प्रमाणेच 'ही' 40 गावे जैवविविधता नोंदवह्या तयार करण्यासाठी पुढे सरसावली

जैवविविधतेत निसर्ग अबाधित राखण्यावर भर : डॉ. सरमोकादम
Published on

Biodiversity In Goa: राज्याच्या जैवविविधतेत दडलेय काय हे हुडकून त्यातून कशाचे संवर्धन करणे आवश्यक आहे हे ठरवत तसे काम आता 40 गावांमध्ये मार्गी लागले आहे.

मये गावाचा जैवविविधता नकाशा (बायोडाव्हर्सिटी ॲटलास) हा लोक जैवविविधता नोंदवहीतून तयार झाला आहे.

इतर गावांनी ॲटलास तयार केले नसले, तरी वेगवेगळी संवर्धनाची कामे हाती घेतली आहेत. गावातील निसर्ग अबाधित राखण्यासाठी लोकजागृती करण्यावर गोवा जैवविविधता मंडळाचा भर आहे.

त्यामुळे निसर्गावर घाला घालण्याचे प्रकार ग्रामस्थच गाव पातळीवर थोपवतील, हाणून पाडतील अशी ही व्यवस्था आहे.

मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, गावातील जैवविविधता म्हणजे केवळ वेली, वृक्ष नव्हेत, तर गावातील पारंपरिक ज्ञान ज्यात वैद्यकीय ज्ञान, पारंपरिक अवजारे करण्याचे ज्ञान यांचा समावेश आहे.

त्याशिवाय परिसरातील पशू, पक्षी, पाणवठे, झरे, तळ्या आदींची नोंद केली जात आहे. चाळीस गावांनी हे काम पूर्ण केले आहे. राज्यातील प्रत्येक १९१ पंचायतींच्या पातळीवर जैवविविधता समित्या नेमल्या आहेत.

त्या समित्या ग्रामस्थांशी चर्चा करून ही नोंदवही तयार करतात. त्यात सातत्याने भर घातली जाते. त्या नोंदवहीला आधी पंचायत मंडळाच्या पातळीवर, त्यानंतर ग्रामसभेच्या पातळीवर व शेवटी राज्यस्तरीय समितीच्या पातळीवर मान्यता घ्यावी लागते.

Biodiversity In Goa
Bicholim School: डिचोलीतील धक्कादायक घटनेने खळबळ, श्‍‍वासोच्‍छवासाच्या त्रासाने 12 विद्यार्थिनी अस्वस्थ

या गावांच्या नोंदवह्या तयार

कुडतरी, वेळ्ळी, सुर्ल, खोतोडे, राशोल, वेलिंग प्रियोळ, मोरजी, पर्रा, नेवरा, वेरे वाघुर्मे, कुर्टी खांडेपार, काले, आंबावली, श्रीस्थळ, आगरवाडा चोपडे, पणजी शहर, हणजुणे कायसूव, चिखली, सांकवाळ, पर्ये, मांद्रे, करमळी, शिरदाव पाळे, पार्से, सांत इस्तेव, वेळसाव पाळे, नुवे, सांताक्रुझ, पेन्ह द फ्रांका, रिवण, चिंबल, मोले, पोंबुर्पा, चोडण माडेल, राय, भिरोंडा, केरी तेरेखोल, पिळगाव आणि मोपा गावातील जैवविविधता नोंदवह्या तयार करून त्यांना तिहेरी मान्यता मिळाली आहे.

Biodiversity In Goa
Bicholim School: 'त्या' धक्कादायक घटनेत विद्यार्थ्यांचा हात? शाळा व्यवस्थापनाकडून गंभीर दखल

कृषी उत्पादनांचे पुनरुज्जीवन

जैवविविधता नोंदवहीच्या जागृतीमुळे कुडतरी गावाने पारवी हा भाताचा प्रकार पुनरुज्जीवित केला. पर्रा येथील कलिंगडांची जात पुनरुज्जीवित केली गेली.

श्रीस्थळ येथे रानभाज्यांची नोंद केली गेली आणि अवजारांच्या स्थानिक शब्दांची सूची तयार करण्यात आली आहे.

Biodiversity In Goa
CM Pramod Sawant: प्रशिक्षण घेण्यासाठी नाखूश, आता कामावर हजर होण्यासही अनुत्सुक, तब्बल 'एवढ्या' जणांची नोकर भरतीकडे पाठ

संशोधनाचेही कार्य : पोंबुर्पा येथील झऱ्याच्या पाण्याला औषधी गुणधर्म आहेत. त्याची नोंद नोंदवहीत झाल्यानंतर त्यावर संशोधन हाती घेण्यात आले.

खोतोडा येथील प्राचीन जीवाश्मांवर लखनौ येथील बिरबल सहानी संस्थेने संशोधन हाती घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com