CM Pramod Sawant: प्रशिक्षण घेण्यासाठी नाखूश, आता कामावर हजर होण्यासही अनुत्सुक, तब्बल 'एवढ्या' जणांची नोकर भरतीकडे पाठ

मुख्यमंत्र्यांची कबुली : प्रशिक्षण काळात विद्यावेतन देऊनही पाठ साडेसहा हजार उमेदवार
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री शिकावू उमेदवार योजनेखाली सरकारने 9 हजार पदांची निर्मिती केली. त्यासाठी 14 हजार जणांनी नोंदणी केली.

मात्र, सुमारे साडेसहा हजार उमेदवारांनी कामावर हजर होण्यासाठी अर्जच केलेले नाहीत, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उघड झाली.

त्यांनी या बैठकीत या योजनेसह स्वयंपूर्ण गोवा आणि माहितीचे आदान प्रदान या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री शिकावू उमेदवार योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण काळात विद्यावेतन (स्टायपेंड) दिले जाते. सुरवातीच्या टप्प्यात विविध खात्यांत अशा ९ हजार पदांची निर्मिती करण्यात आली.

त्याशिवाय निर्माण केलेली खासगी क्षेत्रातील पदे भरली गेली; मात्र सरकारी क्षेत्रातील पदांवर २,५०० जणच हजर झाले आहेत.

CM Pramod Sawant
Bicholim School: डिचोलीतील धक्कादायक घटनेने खळबळ, श्‍‍वासोच्‍छवासाच्या त्रासाने 12 विद्यार्थिनी अस्वस्थ

यापुढे सरकारी नोकर भरती गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा आयोग पूर्ण क्षमतेने काम करेल. सरकारी नोकरीसाठी प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्याचा सरकारचा विचार आहे.

मात्र, प्रशिक्षण घेण्यासाठीच उमेदवार नाखूश असल्याचे साडेसहा हजार जणांनी या योजनेत अर्ज करून, करार करूनही सहभागी होण्यास विलंब केल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या बैठकीनंतर सांगितले की, मुख्यमंत्री शिकावू उमेदवार योजना आणि कुशल कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच व्यावसायिक वाढीस चालना देण्यासाठी चर्चा झाली.

वित्त खात्यांतर्गत डेटा विश्लेषण कक्ष स्थापन केला आहे, जो डेटा कार्यक्षमतेने वापरण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात १० निवडक खाती डेटा प्रदान करतील. परिणामी विश्लेषणात्मक अंतर्दृष्टीचा प्रभावी वापर करून महसुलात १०-१५ टक्के अपेक्षित वाढ होईल.

या बैठकीला आदिवासी कल्याण खात्याचे सचिव सरप्रीत सिंग गिल, कौशल्य विकास खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Bicholim School: 'त्या' धक्कादायक घटनेत विद्यार्थ्यांचा हात? शाळा व्यवस्थापनाकडून गंभीर दखल

...तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी

सरकारची सुमारे साडेसहा हजार पदे रिक्त राहिली आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांसोबत वर्षभर प्रशिक्षण घेण्याचे करार केले. आजच्या बैठकीवेळी एकाच उमेदवाराने दोन-चार ठिकाणी असे करार केल्याचेही आढळून आले.

त्यामुळे पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री शिकावू उमेदवार योजनेखाली उमेदवार प्रशिक्षणासाठी किंवा कामावर हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्याचे सरकारने ठरवले आहे.

गृह खात्यात १,८५० पदे रिक्त

मुख्यमंत्री शिकावू उमेदवार योजनेखाली गृह खात्यात सध्या १ हजार ८५० पदे रिक्त आहेत, तर सार्वजनिक बांधकाम खात्यात ९६६ पदे रिक्त आहेत. या प्रशिक्षणार्थींना १२ दिवसांची किरकोळ रजा आणि १५ दिवसांची वैद्यकीय रजा मिळेल.

या योजनेखाली सरकारने १८ हजारांहून अधिक जागा निर्माण केल्या; पण उमेदवार मिळत नाहीत. अनेकांना त्यांच्या पसंतीचे काम मिळत नसावे म्हणून ते अर्ज करत नसावेत, असे दिसते. त्याशिवाय निवासस्थान आणि कामाचे ठिकाण यांच्यातील अंतरही उमेदवारांकडून प्रतिसाद न मिळण्याचे कारण असू शकते. - एस. एस. गावकर, संचालक, कौशल्य विकास विभाग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com