Mapusa Municipality: म्हापशात सोपो घोटाळ्याचा आरोप

बोलीदार फिरकेनात : सोपोसह पे-पार्किंगच्या लिलाव निविदेत कपात
Mapusa Municipal Council
Mapusa Municipal Council Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipality म्हापसा येथील मार्केट सोपो आणि पे-पार्किंगची निविदा जादा दराने असल्याने म्हापसा पालिकेला बोलीदार सापडत नव्हते. परिणामी, पालिका मंडळाने या दोन्ही लिलावांची बोली कमी करीत पूर्वीच्या ठरावात सुधारणा केली व दरांमध्ये 10 टक्के कपात केली.

विशेष म्हणजे, मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केल्यामुळेच म्हापसा पालिकेला मार्केट सोपो संकलनातून मागील दोन महिन्यांत लाखो रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला.

Mapusa Municipal Council
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरात वाढ; दक्षिण गोव्यात किंमती स्थिर

या नवीन सुधारीत ठरावानुसार मार्केट सोपोची बोली ही आता 1.86 कोटी रुपये असेल आणि पे-पार्किंगची बोली 72 लाख रुपये करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेतला. नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली म्हापसा पालिका मंडळाची आज सर्वसाधारण बैठक झाली.

यावेळी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चंद्रकांत शेटकर, उपनगराध्यक्ष विराज फडके व इतर नगरसेवक उपस्थित होते, तर नगरसेवक चंद्रशेखर बेनकर हे गैरहजर राहिले.

मार्केट सोपोचे कंत्राट हे मार्च 2023 मध्ये संपुष्टात आल्यानंतर म्हापसा पालिकेने आपल्या कामगारांमार्फत स्वतःहून मार्केट सोपो गोळा करण्यास सुरवात केली.

त्यानुसार, एप्रिलमध्ये पालिकेला ७ लाख ९१ हजार ६०० रुपये मिळाले, तर मे मध्ये १० लाख १ हजार ९२० रुपये मिळाले. या दोन महिन्यांत फक्त १८ लाख रुपये आले.

मात्र, सोपो कंत्राटदार असताना महिन्यांची सरासरी ही १३ लाख रु. असायची. त्यामुळे पालिकेला हा तोटा असल्याचे म्हणत नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर, कमल डिसोझा, प्रकाश भिवशेट, तारक आरोलकर आदी नगरसेवकांनी नगराध्यक्षांना लक्ष्य केले.

Mapusa Municipal Council
CM Pramod Sawant: कौशल्य विकास लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री आज साधणार संवाद

कमल डिसोझा म्हणाल्या की, म्हापसा पालिकेच्या या तोट्याला मुख्याधिकारी व नगराध्यक्ष जबाबदार आहेत. त्यांनी वेळीच पावले उचलली नसल्याने ही स्थिती उद्भवली.

मार्केट सोपो हा एकप्रकारचा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर चर्चेअंती या मार्केट सोपोची बोली व सोपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला.

त्याचप्रमाणे, पे-पार्किंगच्या बोली निविदेत सुधारणा केली. त्यानुसार, नवीन बोलीची किंमत ही ७२ लाख रुपये केली. पूर्वी ही बोली ८० लाख रुपये होती.

नुकताच, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हापसा पालिका कार्य क्षेत्रातील दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पे-पार्किंग अधिसूचित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com