Goa Mansoon 2023 : पहिल्याच पावसाचा सत्तरी तालुक्याला फटका, रस्ते पाण्याखाली, वीज गुल

अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
Goa Mansoon
Goa Mansoon Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mansoon : आज येणार, उद्या येणार अशा विवंचनेत असलेल्या सत्तरी तालुक्यातील नागरिकांना आज पाऊस पडल्याने हायसे वाटले. काही ठिकाणी आज गडगडाटासह मोठ्या प्रमाणावर पावसाचे आगमन झाले.

गेल्या काही दिवसांत वातावरणात प्रचंड उकाडा वाढला होता. त्यामुळे लोक उष्णतेने हैराण झाले होते, पण आज सुमारे तासभर सत्तरी तालुक्यातील काही गावांत पाऊस पडला. ग्रामीण भागात रस्त्यावरून काही ठिकाणी पाणी वाहात होते.

सत्तरी तालुक्याला सर्वांगीण विकासाची व्याख्या नेहमीच केली जाते. अनेक राजकीय कार्यक्रमात विकसीत तालुका असे संबोधले जाते. तरीही पावसाच्या एकाच थेंबाने वीज गायब होण्याचे प्रकार सत्तरीच्या ग्रामीण भागात वाढले आहेत. आज पावसाने जोर धरताच काही मिनिटांतच वीजपुरवठा खंडित झाला. नगरगाव पंचायत भागात वीज गायब झाली होती. वीज बंच केबल्सची समस्या गुरुवारीही दिसून आली.

वाळपईतील रस्ते आजच्या पहिल्या पावसातच पाण्याखाली गेले होते. दुपारी दोन ते संध्याकाळी ५ पर्यंत मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अवघ्या काही तासात वाळपईत पाणीच पाणी झाले होते. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

Goa Mansoon
Goa News: पाणीटंचाईसह आता विजेचा लपंडाव; मांद्रेवासियांवर दुहेरी संकट

काणकोणात बरसल्या सरी...

काणकोण तालुक्यातील प्रचंड उष्म्यामुळे हैराण झालेल्या जनतेला आज दुपारी १२ पासून अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसल्यामुळे दिलासा मिळाला. दुपारी पावसाने हजेरी लावल्याने माळरानावर लावण्यात येणाऱ्या मिरचीची रोपे काढण्याचे काम संध्याकाळी सुरू झाले होते.

Goa Mansoon
Panaji : पहिल्याच पावसाने मिरामार सर्कल जलमय, स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित

साकोर्ड्यात दमदार पाऊस

साकोर्ड्यात आज दुपारी २.३० च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने अनेक दिवस आभाळाकडे नजरा ठेवून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला. सायंकाळी उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होती. पावसाला सुरवात झाल्यावर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार सुरूच होते.

Goa Mansoon
Panaji : लोहिया मैदानावर जाहीर सभा; म्हादईप्रश्नी सरकार गंभीर नाही - निर्मला सावंत

बेंडवाडा पुलावर पाणी!

सांगेत आज दुपारनंतर पावसाने जोर धरल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असले तरी बेंडवाडा सांगे पुलावर पावसाचे पाणी तुंबून राहत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम खत्याच्या रस्ता विभागाने यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com