Mankurad Mango: मानकुराद बाजारात आला; पण दर ऐकून हिरमोड झाला! एका डझनासाठी मोजावे लागतायत 'इतके' हजार

Goa Mankurad Mango Price: आंब्यांच्या झाडांना सध्या मोहर फुटत असतानाच शिवोली बाजारात ‘फळांचा राजा’ म्हणजे मानकुराद आंबा दाखल झाला आहे.
Mankurad Mango
Mankurad MangoDainik Gomantak
Published on
Updated on

म्‍हापसा/पणजी: आंब्यांच्या झाडांना सध्या मोहर फुटत असतानाच शिवोली बाजारात ‘फळांचा राजा’ म्हणजे मानकुराद आंबा दाखल झाला आहे. पण त्‍याची किंमत ऐकून लोकांच्‍या तोंडचे पाणी पळत आहे. एक आंबा (नग) ६०० रुपये तर एक डझन ७ हजार २०० रुपये या दराने या आंब्याची विक्री होत आहे.

ओशेल-शिवोलीतील आंबा व्यापारी समीर धारगळकर यांनी यंदा प्रथम मंगळवार, ३ रोजी हंगामातील पहिल्या मानकुरादची विक्री केली. आंबा बाजारात येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत.

Mankurad Mango
Valentine Day In Goa: दिल चाहता है... मग 'व्हॅलेंटाईन डे' करा गोव्यात साजरा; बीचेस नाही इथेही करा मौज

दरम्‍यान, मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भेंडीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली. मागील आठवड्यात ७० रुपये प्रतिकिलो दराने भेंडी विकली जात होती, ती आता ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचा दर ४० रुपये किलो असा स्थिर आहे. आले १२० रुपये किलो तर मध्यम आकाराची लसूण २२० रुपये किलो दराने विकले जात आहे.

Mankurad Mango
Goa Cricket Captain: गोवा क्रिकेट संघात मोठा बदल! 'या' अष्टपैलूकडे संघाचे नेतृत्व; कशी असणार टीम? वाचा..

१०० रुपयांना ६ कैऱ्या

दुसरीकडे लहान-लहान कैऱ्या बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. या कैऱ्यांना चांगली मागणी आहे. बाजारात १०० रुपयांना ६ कैऱ्या विकल्या जात आहे. लोणचे तसेच खारवण्‍यासाठी या कैऱ्या प्रामुख्याने खरेदी केल्या जातात. सोबतच तोतापुरी आंबादेखील बाजारात दाखल झाला असून २०० रुपये प्रतिकिलो दराने तो विकला जात आहे.

भाज्यांचे दर (दर प्रतिकिलो)

भाज्‍या फलोत्पादन घाऊक बाजार

भेंडी ५४ ८०

कोबी २३ ३०

गाजर २९ ५०

फ्लॉवर ३० ४०

बिन्स ५२ ७०

चिटकी ४३ ७०

मिरची ६८ १००

कांदा २७ ४०

बटाटा २४ ४०

टोमॅटो ३० ४०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com