Goa Cricket Captain: गोवा क्रिकेट संघात मोठा बदल! 'या' अष्टपैलूकडे संघाचे नेतृत्व; कशी असणार टीम? वाचा..

Goa Under 23 Cricket Team: पंजाबने पहिल्या डावात ५ बाद ५३३ घोषित अशी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोव्याला अनुक्रमे ९२ व १४५ धावाच करता आल्या.
Goa Cricket Team | Goa Cricket New Captain
Goa Cricket Team | Goa Cricket New CaptainDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंजाबविरुद्धच्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत सांगे येथे घरच्या मैदानावर अवघ्या अडीच दिवसांतच दारुण पराभव पत्करलेल्या गोव्याच्या २३ वर्षांखालील संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. १९ वर्षीय अष्टपैलू यश कसवणकर केरळविरुद्धच्या आगामी लढतीत संघाचे नेतृत्व करेल.

पंजाबने पहिल्या डावात ५ बाद ५३३ घोषित अशी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोव्याला अनुक्रमे ९२ व १४५ धावाच करता आल्या. या लढतीतून गोव्याला गोलंदाजीतील फक्त एकच गुण मिळाला होता. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने अतिशय खराब कामगिरीची गंभीर दखल घेत आणि भविष्याचा विचार करून २३ वर्षांखालील संघात १९ वर्षांखालील संघातील सफल खेळाडूंना संधी दिली आहे.

मागील पाच लढतीत गोव्याचे नेतृत्व केलेला फलंदाज आर्यन नार्वेकर यालाही संघातील स्थान राखता आलेले नाही. गोवा व केरळ यांच्यातील एलिट अ गट चार दिवसीय सामना सहा फेब्रुवारीपासून तिरुअनंतपुरम येथे खेळला जाईल.

Goa Cricket Team | Goa Cricket New Captain
Ranji Trophy: दर्शन - अर्जुन तेंडुलकरची झुंज अपयशी! गोव्याच्या फलंदाजांची शरणागती; केरळ 9 विकेट राखून विजयी

गोव्याने स्पर्धेतील पाच लढतीत तीन पराभव पत्करले आहेत. एक लढत अनिर्णित राहिली असून एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. कर्णधारपदी निवड करण्यात आलेल्या यश याने गतआठवड्यात केरळविरुद्ध गोव्याच्या रणजी करंडक संघात पदार्पण केले होते, सीनियर गटातील पहिल्याच डावात त्याने अर्धशतक नोंदविण्याची किमया साधली होती.

Goa Cricket Team | Goa Cricket New Captain
C K Nayudu Trophy: गोव्याचा दारुण पराभव! पंजाबचा एक डाव, 296 धावांनी विजय; फलंदाजांची दुसऱ्या डावातही शरणागती

संघ असा ः यश कसवणकर (कर्णधार), बन्सिल पंड्या, रिजुल पंड्या, शंतनू नेवगी, कौशल हट्टंगडी, दिशांक मिस्कीन, जीवनकुमार चित्तेम, अनुज यादव, चिगुरुपती व्यंकट, समर्थ राणे, शिवेन बोरकर, कौस्तुभ पिंगुळकर, नित्यय कुंकळकर, शार्दुल शेट, विराज नाईक, मिहीर गावडे, सुजय नाईक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com