Mankurad Mango Goa: एक आंबा 500 रुपये! गोव्यात प्रसिद्ध मानकुराद आंब्याला सोन्याचा भाव

Mango Price Goa: गोवेकरांसाठी महत्वाची बाब म्हणजे मडगावात मानकुराद विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे
Goa Mankurad mango
Goa Mankurad mangoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सध्या सगळीकडेच आंब्यांच्या हंगामाला सुरुवात होतेय. गोव्यात देखील मानकुराद, हापूस, तोतापुरी आंब्यांनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. ही हंगामाची सुरुवात असल्याने अजून आंबा मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध झाला नाहीये आणि म्हणूनच आंब्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गोवेकरांसाठी महत्वाची बाब म्हणजे मडगावात मानकुराद विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

यंदाचा आंब्यांचा हंगाम उत्तम असल्याने येत्या १५ दिवसांत आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या मडगावच्या बाजारात हापूस, पायरी, मानकुराद व तोतापुरी आंबा विक्रीसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय.

मडगाव बाजारात एक मानकुराद आंबा ४५० रुपयांना विकला जातोय म्हणजेच डझनभर आंब्यांची किंमत साडेपाच हजारांच्या जवळपास आहे.

Goa Mankurad mango
Mankurad Mango : अवीट मानकुराद यंदा का रुसला? उत्पादनात ४० टक्क्यांनी घट

याउलट एक हापूस आंबा १०० रुपयांना विकला जात असल्याने डझनभर आंब्यांची किंमत १२०० रुपयांपर्यंत गेली आहे. पायरी आंबा एक हजार रुपये डझन तर तोतापुरी आंबा ६०० ते ७०० रुपये डझन असा विक्री केला जात आहे.

पुढील पंधरा दिवसांत आंब्याचे पीक वाढल्यानंतर किमती कमी होण्याची शक्यता आहे. आंब्यांप्रमाणे कैरी देखील विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाली आहे. मानकुराद आंबा हे गोव्याचे विशेष पीक असल्याने हा आंबा विकत घेण्यासाठी नेहमीच लोकांची गर्दी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com