Mankurad Mango : अवीट मानकुराद यंदा का रुसला? उत्पादनात ४० टक्क्यांनी घट

Mankurad Mango : ब्रागांझा : उशिरा उत्पादन : झाडांची निगा राखणे गरजेचेच
Goa  Mango
Goa MangoDainik Gomantak
Published on
Updated on

गंगाराम आवणे

Mankurad Mango :

पणजी, गोवा राज्यात विविध जातीच्या आंब्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु मानकुराद आंबा हा गोवेकरांच्या सर्वांत पसंतीचा, त्यामुळे त्याला मागणीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यंदा मानकुराद आंब्यांच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी घट झाली असून यंदा एक महिना उशिरा आंब्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाल्याचे कृषीतज्ज्ञ, मार्गदर्शक मिंगेल ब्रागांझा यांनी सांगितले.

दरवर्षी एप्रिल महिन्यात येणारे पीक यंदा हवामान बदलामुळे एक महिना उशिरा मिळाले. यंदा मे महिन्यात उत्पादनाला सुरवात झाली त्यामुळे पिकात घट झाली. तसेच अनेकदा ज्यावेळी मानकुराद आंब्याला चांगला दर असतो त्यावेळी झाडावरून कच्चे आंबे उतरविले जातात. अशावेळी ते चांगल्याप्रकारे तयार झालेले नसतात. असे आंबे ज्यावेळी पिकविले जातात त्यावेळी त्यांची चव बदलते, असे ब्रागांझा यांनी सांगितले.

मानकुराद आंब्यांच्या उत्पादनात घट होण्यास एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे इतर राज्यांतील शेतकरी हापूस व इतर आंब्यांची निगा घेतात, खत घालतात तशी निगा राज्यात ‘मानकुराद’ची राखली जात नाही. मानकुराद आंब्यांवर येणारा ‘बेनूर’ वेळच्या वेळी काढल्यास उत्पादन चांगले येते; परंतु काही उत्पादक तसे करत नसल्याने गुणवत्तेत तसेच उत्पादनात घट होत असल्याचे ब्रागांझा यांनी सांगितले.

Goa  Mango
Goa Disaster Management: 'सचेत' मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण : मुख्यमंत्री

हेक्टरी २ लाख अनुदान

यंदा राज्यात मानकुरादच्या उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. गोव्यात सुमारे ८४ प्रकारचे आंबे होतात. जे शेतकरी डोंगराळ भागात आंब्यांची लागवड करू इच्छितात त्यांना शासनाकडून हेक्टरी २ लाखांचे अनुदान देण्यात येते. जे नर्सरी सुरू करू इच्छितात त्यांना मानकुरादची रोपे कशी बनवायची याचे प्रशिक्षणही देण्यात येते, असे कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो यांनी सांगितले.

सरकारी स्तरावर अनास्था!

मानकुराद आंब्यांना ‘जीआय’ टॅग मिळाला आहे. ‘मानकुराद’ला परदेशातदेखील चांगली मागणी आहे; परंतु हापूस तसेच इतर आंब्यांची ज्याप्रकारे विक्री होते तशी होत नाही. मानकुराद आंब्यांचे कशाप्रकारे पीक घ्यावे याचे सरकारी स्तरावरदेखील योग्य प्रशिक्षण दिले जात नसल्याची खंत मिंगेल ब्रागांझा यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

UTA Political Mobilisation Goa
Goa Politics
Goa Monsoon Weather Update
Samuel Braganza Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com