Goa Drowning Death: पाय घसरला अन् घात झाला! रात्रीच्या वेळी मांडवी नदीत पडून ओडिसाच्या मच्छीमार मजुराचा दुर्दैवी अंत

Mandovi River Drowning Death: मांडवी नदीच्या पात्रात एका ३५ वर्षीय मच्छीमार कामगाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Goa Drowning Death
Goa Drowning DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मांडवी नदीच्या पात्रात एका ३५ वर्षीय मच्छीमार कामगाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मासेमारी नौकेवर काम करत असताना अचानक तोल जाऊन नदीत पडल्याने या कामगाराचा मृत्यू झाला. जुना गोवा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? 

समोर आलेल्या माहितीनुसार, जोरेल टेटे (वय ३५) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो मूळचा ओडिसा राज्यातील सुंदरगड येथील रहिवासी होता. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

जोरेल एका मासेमारी नौकेवर मजूर म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल मांडवी नदीच्या पात्रात कोसळला. रात्र असल्याने आणि नदीचा प्रवाह वेगवान असल्याने तो काही क्षणांतच दिसेनासा झाला.

Goa Drowning Death
Tirumala Tirupati Goa: ..अखेर ‘तिरुमला-तिरुपती’चे अध्यक्ष गोव्यात! सोसायटीविषयी कागदपत्रे केली सादर; सहकार मंत्र्यांसोबत बैठक

कोस्टल पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम 

घटनेची माहिती मिळताच जुना गोवा पोलिसांनी तटरक्षक सुरक्षा पोलीस (Coastal Security Police) दलाला पाचारण केले. रात्रीपासूनच नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर, जुना गोवा येथील बायगिणी भागात मांडवी नदीच्या पात्रातून जोरेलचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.

Goa Drowning Death
Goa Vehicle Theft: एक-दोन नव्हे तर 7 चोरीच्या गाड्या जप्त! सराईत वाहन चोरट्याला ठोकल्या बेड्या, साळगाव पोलिसांचा 'स्ट्राँग' गेम

अपघाती मृत्यूची नोंद 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार पूर्णपणे अपघाती असावा असा अंदाज आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची पुरेशी साधने होती का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

ओडिसातील त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे मासेमारी नौकेवरील इतर कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नौका मालकांनी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com