Goa: कोळशाचे आगार करण्याऐवजी 'मुरगाव बंदर' पर्यटन केंद्र बनवा- सरदेसाई

आंतरराष्ट्रीय जलसफर (क्रूझ)पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करावे अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward President Vijay Sardesai) यांनी केली आहे.
Goa Forward President Vijay Sardesai
Goa Forward President Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केंद्र सरकारचे (Central Government) बंदर आणि जल दळणवळण तसेच पर्यटन या खात्याचे राज्यमंत्री असलेले श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी या आपल्या दोन्ही खात्यांचा गोव्याच्या (Goa) भल्यासाठी उपयोग करीत मुरगाव बंदर हे कोळशाचे आगार न बनविता आंतरराष्ट्रीय जलसफर (क्रूझ)पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करावे अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Goa Forward President Vijay Sardesai) यांनी केली आहे.

नाईक यांना लिहिलेल्या अधिकृत पत्रात सरदेसाई यांनी गोव्याची जनता त्यांच्याकडे आशेने पाहत असून केंद्रात गोव्याचे प्रश्न तेच चांगल्या रीतीने सोडवू शकतात असे म्हटले. अत्यंत महत्वाच्या वेळी त्यांच्याकडे ही महत्त्वाची खाती आली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

Goa Forward President Vijay Sardesai
Goa: कारखाण्यातून दुर्गंधी, लोक हैराण; उद्योग व आरोग्यमंत्र्याकडून दखल

मुरगाव बंदराचा विस्तार कोळशाचे आगार करण्यासाठी होत असून कोळशाच्या वाहतुकीला सुलभ व्हावे यासाठी गोव्यातील नद्यांचेही राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे. मात्र गोवा कोळशाचे आगार झाल्यास त्याच्या गोव्याच्या पर्यावरणावरच नव्हे तर पर्यटनावरही विपरीत परिणाम होणार आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. खनिज व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एकमेव स्त्रोत बाकी राहिला आहे. पण कोळशाची वाहतूक सुरू झाल्यास हे पर्यटन संपुष्टात येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

Goa Forward President Vijay Sardesai
Goa: धनगर समाजाच्या विषयावर, मुख्यमंत्री उद्या घेणार अमित शहांची भेट

त्यामुळे नाईक यांनी आपल्या दोन्ही खात्यांचा उत्तम उपयोग करून मुरगाव बंदरावरील कोळशाची हाताळणी कमी करून या बंदराचा विकास आंतरराष्ट्रीय जलसफर (क्रूझ) पर्यटन केंद्र म्हणून करावा आणि गोव्याला या कोळशाच्या संकटातून मुक्त करावे अशी मागणी सरदेसाई यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com