Goa: कारखाण्यातून दुर्गंधी, लोक हैराण; उद्योग व आरोग्यमंत्र्याकडून दखल

प्रकल्पातून जनावर कुजल्यासारखी दुर्गंधी दररोज सुटते व ती परिसरात पसरते. त्यामुळे लोक हैराण झाले असून परिसारतील लोकांनी सह्यांची मोहिम सुरु केली आहे.
सुकरोप्ट पेपर मील
सुकरोप्ट पेपर मील
Published on
Updated on

पणजी: होंडा येथील औद्योगीक वसाहतीमध्ये (IDC) नव्याने सुरु झालेल्या सुकरोप्ट पेपर मील या कारखाण्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंंधी पसरत असून त्यामुळे परिसरातील लोकही हैराण झाले आहेत. या गोष्टीची दखल आरोग्यमंत्री तथा उद्योगमंत्री विश्‍विजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी घेऊन पंचायतीला दुर्गंधीबाबत योग्य तो ठराव घेऊन पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्या सोमवार ता.19 रोजी होणाऱ्या पंचायतीच्या बैठकीत याबाबतचा ठराव येणार आहे.

होंडा आयडीसीमधील टेल्को प्रकल्पाजवळ मुख्य रस्त्यालगत सुकरोप्ट पेपर मील नावाचा कारखाणा उभारण्यात आले आहे. भव्यदिव्य असा हा प्रकल्प राज्य सरकारच्या मान्यतेनेच सुरु झालेला आहे. या प्रकल्पातून जनावर कुजल्यासारखी दुर्गंधी दररोज सुटते व ती परिसरात पसरते. त्यामुळे लोक हैराण झाले असून परिसारतील लोकांनी सह्यांची मोहिम सुरु केली आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पात परप्रांतिय कामगारांचा भरणा आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार नाहीतच उलट आरोग्य बिघडवणारी दुर्गधी तथा दर्फ मात्र सोसावा लागत आहे. या दुर्गंंधीमुळे अनेकांना हॉटेल, गाडे या सारखे आपले व्यावसाय बंद करण्याच पाळी आली आहे.

सुकरोप्ट पेपर मील
Goa:"एकवटान झुजुया" या कोरोना जागृती व्हिडिओला लाभतो प्रचंड प्रतिसाद

सदर कारखाण्यातील दुर्गंधी व स्थानिकांना देण्यात न आलेले रोजगार या विषयावर होंडा पंचायतीचे माजी उपसरपंच व भाजपचे युवा नेते विश्‍वजित कृष्णराव राणे यांच्या नेतृत्वाखाली हल्लीच कारखाण्यासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिकांना रोजगार देण्याचे व दुर्गंधी कमी करण्याचे आश्‍वासन पेपरमीलच्या व्यवस्थापनाने दिले होते. मात्र दोन्ही गोष्टी झालेल्या नाहीत. होंडा पंचायत क्षेत्रातील पोस्तवाडा व आयडीसी परिसर तसेच पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील शांतीनगर व चोडणकर नगर येथील नागरिकांना या दुर्गंधीचा जास्त त्रास होत असल्याने येथील नागरिकांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरु केली आहे. त्यानंंतर मुख्यमंत्री, उद्योगमंत्री , पंचायत यांना हे निवेदन दण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com