Goa Loksabha Election 2024 Result Update: गोव्यातील पहिल्या फेरीचे कल हाती; दक्षिणेत भाजपला झटका तर उत्तरेत दिलासा

Goa Loksabha Election 2024 Result Update:
Shripad Naik And Ramakant Khalap
Shripad Naik And Ramakant Khalap
Published on
Updated on

Goa Loksabha Election 2024 Result Update

लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा आज निकाल आहे. यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली. गोव्यातील दोन जागांसाठी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढाई पाहायला मिळाली. दरम्यान, 8 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. यातच आता एका तासानंतरचे आकडे समोर आले आहेत.

पहिल्या फेरीनंतर दक्षिण गोव्यात काँग्रेसला 4300 ची आघाडी मिळाली आहे. दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस आघाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे पिछाडीवर आहेत.

उत्तर गोव्यातून भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक 2648 ची आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप 1730 मतांनी पिछाडीवर आहे. नाईक आणि खलप यांच्यात निकराची लढत पाहायला मिळत आहे. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास याआगोदर भाजपने वर्तवला आहे. तर दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांची एका तासानंतरची पिछाडी भाजपला धक्का मानला जात आहे.

दक्षिण गोव्यात भाजप मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करेल असे काही दिवसांपूर्वीच भाजपने म्हटले होते. परंतु एका तासाचा कल पाहता भाजपसाठी ही काँटे की टक्कर ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com