Goa Loksabha Election Result 2024: ’दक्षिण गोव्याबाबत खंत, पण गोमंतकीयांचा कौल मान्य’- भाजप प्रदेशाध्यक्ष

Goa Loksabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा पुन्हा एकदा जिंकू असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला होता.
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak

Goa Loksabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा पुन्हा एकदा जिंकू असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र भाजपला केवळ उत्तर गोव्याचीच जागा राखता आली. उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनी मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा विजय नोंदवला. मात्र पल्लवी धेंपे यांना दक्षिण गोव्यात मोठ्या पराभावचा सामना करावा लागला.

दक्षिण गोव्यातून भाजपने पल्लवी धेंपे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र त्यांना दक्षिण गोव्यात भाजपला विजय मिळवून देण्यात अपयश आले. दरम्यान, विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गोव्यातील जनतेचे आभार मानले. गोव्यातील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे तानावडे यावेळी म्हणाले. भाजप पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने दोन्ही जागा जिंकेल असा विश्वास होता परंतु एकाचा जागेवर समाधान मानावे लागल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

Sadanand Shet Tanawade
Goa Loksabha Election 2024 Result: दुपारपर्यंत ठरणार गोव्याचे खासदार, दोघांनाही दोन्ही जागांबाबत विश्वास

दरम्यान, तानावडे यांनी श्रीपाद नाईक यांना विजयी करण्यासाठी कोणत्या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले याचे विश्लेषण केले. नाईक यांना आमदार दिव्या राणे यांच्या पर्ये मतदारसंघातून 19958 मतांची आघाडी मिळाली. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून 15764 मतांची आघाडी मिळाली. याशिवाय, डिचोली आणि सत्तरी मतदारसंघातून तब्बल 69214 मतांची आघाडी नाईकांना मिळाली.

Sadanand Shet Tanawade
Goa Loksabha Election 2024 Result: उरले दिवस फक्त पाच... कमळ की हात, गोव्यात कोण बाजी मारणार?

तसेच, दक्षिण गोव्यातून 2014 आणि 2019 च्या तुलेनत या लोकसभा निवडणुकीत आम्हाला तब्बल 2 लाख 2000 हजार मते मिळाली. मात्र आम्हाला विजय मिळवता आला नाही याची खंत आहे, असेही तानावडे पुढे म्हणाले. दक्षिण गोव्यात पुन्हा पल्लवी धेंपे मोठ्या मताधिक्याने जिंकतील असा भाजपला विश्वास होता. मात्र काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत मोठा विजय नोंदवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com