Red chilli Price: यंदा गावठी लाल मिरची होणार आणखी ‘तिखट’! पिकावर परिणाम ‘जांबोटीचे अजून नाही दर्शन

Goa local red chilli market price: चालू हंगामात पिकलेली गावठी लाल मिरची बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे. यंदा स्थानिक लाल मिरचीचे दर अजून तरी नियंत्रणात आहेत.
Goan seasonal red chilli
Local chilli availability Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: चालू हंगामात पिकलेली गावठी लाल मिरची बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे. यंदा स्थानिक लाल मिरचीचे दर अजून तरी नियंत्रणात आहेत. असंतुलित हवामान आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे मयेसह डिचोली तालुक्यातील कारापूरच्‍या काही भागात मिरची पिकावर परिणाम झाल्याने यंदा मिरचीचा दर आणखी ‘तिखट’ होण्‍याची शक्‍यता आहे. मात्र तरी देखील आवक कमी असूनही सध्या दर समाधानकारक आहेत.

स्थानिक मळ्यांनी पिकलेल्या लाल मिरचीचा सध्या ६५० ते ७०० रुपये किलो असा दर आहे. पुढील काही दिवसांत मिरचीची आवक वाढली तर दर आणखी खाली येण्‍याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूने कर्नाटकातील जांबोटी भागातील मिरची अद्याप डिचोलीच्या बाजारात दाखल झालेली नाही. आज बुधवारी डिचोलीच्या आठवडी बाजारात मयेसह, मेणकुरे, साळ, केरी-सत्तरी आदी ठरावीक भागातील गावठी मिरची विक्रीस उपलब्ध होती.

Goan seasonal red chilli
Goa Electricity Rate: गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक! वीजमंत्री ढवळीकरांनी दिली माहिती; प्रतियुनिट किती होणार वाढ? वाचा

राज्याबाहेरून येणाऱ्या गुटूर, बेडगी, काश्मिरी आदी मिरचीचे दर परवडण्यासारखे असले तरी अधिकाधिक गृहिणी गावठी मिरचीला पसंती देतात. गेल्या वर्षी सुरवातीलाच ८०० ते ९०० रुपये किलो असे लाल मिरचीचे दर होते. आवक वाढल्यानंतर मात्र लाल मिरची स्वस्त झाली होती. यंदा मात्र सुरवातीलाच मिरचीचे दर नियंत्रणात आहेत.

Goan seasonal red chilli
Arambol Chilly: GI मानांकित हरमल मिरची उत्पादनाकडे दुर्लक्ष? समस्यांमुळे शेतकरी नाराज; विशेष प्रयत्न होण्याची गरज

प्रतीक्षा ‘जांबोटी’ मिरचीची

डिचोलीच्या बाजारात डिचोली, सत्तरी, बार्देश आणि पेडणे तालुक्यातील काही ठरावीक गावांनी पिकणारी स्थानिक मिरची विक्रीस उपलब्ध होत असते. स्थानिक गावठी मिरची पाठोपाठ बहुतेक गृहिणी कर्नाटकातील जांबोटी भागातील मिरचीला पसंती देतात. मात्र अजून बाजारात या मिरचीचे दर्शन झालेले नाही. जांबोटी मिरचीला सध्या जाग्यावरच मागणी असल्याने विक्रेत्यांनी ही मिरची अजून तरी बाजारात विक्रीस आणलेली नाही, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. तरी देखील जांबोटीची मिरची येणार असल्याचा ग्राहकांना विश्‍‍वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com