Arambol Chilly: GI मानांकित हरमल मिरची उत्पादनाकडे दुर्लक्ष? समस्यांमुळे शेतकरी नाराज; विशेष प्रयत्न होण्याची गरज

Arambol Mirchi: गोव्यातील अनेक भागातील विविध प्रकारच्या उत्पादन व वस्तूंना ‘जीआय’ अर्थात भौगोलिक सूचकांक मानांकन प्राप्त करण्यासाठी मागणी होत आहे.
Arambol Chilly
Arambol ChillyDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: गोव्यातील अनेक भागातील विविध प्रकारच्या उत्पादन व वस्तूंना ‘जीआय’ अर्थात भौगोलिक सूचकांक मानांकन प्राप्त करण्यासाठी मागणी होत आहे, त्यामुळे राज्यातील वस्तूंना बाजारपेठ काबीज करण्याची तसेच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ घेण्याची संधी प्राप्त होते. मात्र, त्या वस्तूंच्या उत्पादन वाढीसाठी सरकारकडून खास प्रयत्न होत नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे.

हरमल मिरचीला जीआय मानांकन प्राप्त झाल्यास वर्ष दीड वर्ष सरले. या भागातील शेतकरी दरवर्षी हंगामानुसार मिरची रोपे व अन्य लागवड करून चरितार्थ चालवत आहे. मात्र उत्पादन कमी होत असल्याने त्याबाबत चर्चा तसेच विचारविनिमय आवश्‍यक आहे. कृषी अधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रारंभीच्या काळात योग्य मार्गदर्शन केले व मिरचीला मानांकन मिळाले. त्या काळात शेतकरी संघटना स्थापन केली, मात्र आवश्यक सुसंवाद कधीच झाला नाही. शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावत असतात, त्याबाबत संबंधित खात्याने उपाययोजना तसेच आवश्यक मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे, असे एका शेतकऱ्याने सांगितले.

Arambol Chilly
Goa Agriculture: निर्धार! कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नुवेतील शेतकऱ्यांचा पुढाकार; 50 हजार चौ.मी. जमीन आणणार लागवडीखाली

अधिकाऱ्यांनी संवाद साधावा!

अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांतून एखादा तरी शेतकऱ्यांशी संवाद साधून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. जेणेकरून नवीन शेतकरी मिरची पीक घेण्यास प्रवृत्त होतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

Arambol Chilly
Goa Agriculture: 'स्वयंपूर्ण' गोव्याच्या स्वप्नासमोर निसर्गाचे आव्हान, शेती-संशोधनाच्या अनुषंगाने महत्त्वाचे वर्ष

शेतकरी संघटनेत ताळमेळ नाही

शेतकरी संघटना स्थापन केली, मात्र या संघटनेच्या बैठकाच होत नाही, त्यामुळेही शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com