राज्यातील सर्वात मोठा 130 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत तपास सुरु केला आहे. फातोर्डा-मडगाव ते लंडन अशी घोटाळ्याची व्याप्ती. सर्वांवर कारवाई होणार. अशी तंबी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ताश्कंद येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यात गोव्याचा बेस्ट कोस्टल स्पिरीट शोकेस या पुरस्कराने गौरव करण्यात आला. उझबेकिस्तान पर्यटन समितीने एसयुईचे संचालक दिलशाद बहादिरोवीच यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींना गंडा घालण्यात आला. मायरॉन रॉड्रिग्ज आणि त्याची पत्नी दीपाली परब या दोघांविरोधात गोवा पोलिसांनी तक्रार नोंदवली.
बॉलिवूड स्टार रणबीर कपूरने 55 व्या इफ्फीला हजेरी लावली. 'द ग्रेट शोमन'च्या माध्यमातून राज कपूर यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला आहे.
णजूण ग्रामसभेत रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) रोजी बरीच खळबळ उडाली. डॉ. इनासिओ फर्नांडिस या स्थानिकांने संगीत कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर त्याला इतरांकडून मारहाण करण्यात आली. या ग्रामसेभेत दोन गट सामील होते, एक गट संगीत कार्यक्रमांचे समर्थन करत होता तर तर दुसरा गट संगीत कार्यक्रमांच्या विरोधात होता. हा एकूण प्रसंग आटोक्यात आणण्यासाठी गोवा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि आता घडलेल्या एकूण प्रसंगामुळे ही ग्रामसभा १५ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक गप्प बसणार नाहीत. भाजपला गोव्यातील विरोधकांना संपवायचे आहे, पण ते अशक्य आहे. सरदेसाईंचा हल्लाबोल.
रुमडामळ ग्रामसभेत गॅस सिलिंडर स्फोटाबाबत चर्चा. दुकानांच्या सुरक्षेबाबत सर्वेक्षण केले जाईल. तसेच, संबंधित विभागांना पत्रही देण्यात येणार. सोमवारपासून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरु करण्याचा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला.
एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. सुभाष प्रधान असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा ओडिशातील असून गोव्यातील कांदोळी येथे राहत होता.
पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनाला आता महिलांसह पंचायत मंडळाचा पाठिंबा मिळालेला असून प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावर ठाण मांडून बसण्याचा महिलांचा निर्धार केलाय.
मडगाव येथे कचऱ्याच्या ढिगाला अचानक भीषण आग लागली, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.