Sunburn Goa 2024: धारगळमध्येच होणार सनबर्न महोत्सव; पर्यटन खात्याकडून तत्वत: मान्यता

Sunburn Festival Goa 2024: पेडण्यातील धारगळमध्ये २८ ते ३० असे तीन दिवस सनबर्न महोत्सव होण्याची दाट शक्यता आहे.
Sunburn Goa 2024: धारगळमध्येच होणार सनबर्न महोत्सव; पर्यटन खात्याकडून तत्वत: मान्यता
Sunburn Goa 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Sunburn Festival Goa 2024

पणजी: धारगळमध्ये होणाऱ्या सनबर्न महोत्सवाबाबत दोन मतप्रवाह असताना गोवा पर्यटन खात्याने महोत्सवाला तत्वत: मान्यता दिल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. २८ ते ३० डिसेंबर रोजी धारगळमध्ये हा महोत्सव होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

दरवर्षी वागातोर येथे होणारा सनबर्न महोत्सव धारगळमध्ये होणार अशा चर्चा समोर आल्यानंतर धारगळ स्थानिकांनी महोत्सवाला विरोध सुरु केला. काही दिवसानंतर महोत्सवाबाबत परिसरात दोन मतप्रवाह पाहायला मिळाले. दरम्यान, पंचायतीने महोत्सवाला मान्यता देखील दिली. अशात आता पर्यटन खात्याने महोत्सवाला तत्वत: मान्यता दिल्याने सनबर्नचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

Sunburn Goa 2024: धारगळमध्येच होणार सनबर्न महोत्सव; पर्यटन खात्याकडून तत्वत: मान्यता
Illegal Beef Seized: बोरीत दोन टन गोमांस जप्त; वाळपईतील गोप्रेमीमुळे उघडकीस आला प्रकार

३१ डिसेंबर वगळता २८ ते ३० डिसेंबर रोजी धारगळ येथेच सनबर्न होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी दक्षिण गोव्यात सनबर्न होणार याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सनबर्न आयोजकांनी देखील याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर महोत्सव धारगळमध्ये होईल, अशी माहिती समोर आली अन् त्याला विरोध सुरु झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com