
गोवा भाजपला येत्या जानेवारी २०२५ मध्ये नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. तसेच, जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांची देखील नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार अरुण सिंह यांनी दिली.
मांद्रे माजी सरपंच मारहाण प्रकरणात अटकेत असणाऱ्या सातही जणांना जामीन देण्यात आला आहे. शुक्रवारी (०६ डिसेंबर) रोजी मारहाण प्रकरणातील सात जणांना कर्नाटक येथून अटक करण्यात आली होती. जमीनीच्या वादातून माजी सरपंचांना मारहाण झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
अचानकपणे सुरू झालेल्या अवकाळी पावसाने साखळीवासीयांची सलग दुसऱ्या दिवशीही तारांबळ उडवली. वीजेचा लखलखाट व गडगडाटासह पाऊस सुरू झाला. लोकांना धावपळ करावी लागली.
विकासवाडा कुळे येथे कचरा स्टोरेजमध्ये १२ फुटांचा किंग कोब्रा पकडण्यात आला. या पूर्वीही याच ठिकाणी अजगर तसेच किंग कोब्रा सापडले होते. घाण वासामुळे लोक त्रस्त असून अन्य कुठेही कचरा साठवून ठेवण्याची स्थानिकांची मागणी.
कलंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मांद्रे येथील माजी सरपंच्याना मारहाण केल्याप्रकरणी सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल एसपी अक्षत कौशल यांचे अभिनंदन केले.
जुने गोवे- कदंब बायपासवर एका महिलेचा विनयभंग आणि तिच्या प्रियकराला मारहाण केल्याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी कर्नाटकातील चार पर्यटकांना अटक केली.
जीपीसीसीचे माजी प्रमुख गिरीश चोडणकर यांच्या मालकीच्या कारची शुक्रवारी (दि. ६ डिसेंबर) रोजी सायंकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. गिरीश यांनी दावा केला आहे की, बजरंग दलाच्या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी गोव्यात येण्याची अपेक्षा असलेल्या टी राजा सिंह यांच्या विरोधात केलेल्या ट्विटवरून हा हल्ला झाला असावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.