Goa News: हवेत उडवल्या जाणाऱ्या फुग्यांमुळे मांद्रे माळरानाला आग, 3,000 झाडे जळून खाक; गोव्यातील ठळक बातम्या

Marathi Breaking News 1 January 2025: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, कला क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी
Goa Today News Live: हवेत उडवल्या जाणाऱ्या फुग्यांमुळे मांद्रे माळरानाला आग; 3,000 झाडे जळून खाक
Wildfires In GreeceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Wildfire: हवेत उडवल्या जाणाऱ्या फुग्यांमुळे मांद्रे माळरानाला आग; 3,000 झाडे जळून खाक

रात्री १० वाजल्यानंतर 'फायर वर्क' करणे कायद्याने निर्बंध घातले असले तरी ३१ डिसेंबर रोजी रात्री मांद्रे मतदारसंघातील समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात लाखो रुपये खर्च करून 'फायर वर्क' करण्यात आले. या 'फायर वर्क'मुळे जुनसवाडा-मांद्रे येथील डोंगरावर आग लागली. त्यामध्ये पर्यावरणप्रेमींनी लावलेल्या ५००० पेक्षा जास्त झाडांतील ३००० झाडे जळून खाक झाली.

शिवाय परिसरातील काजू बागायतही नष्ट झाल्याची घटना घडली. अग्निशामन दलाचे बंब पोहोचण्यापूर्वी स्थानिकांनी पुढाकार घेऊन आग विझविण्यात यश मिळवले. 'फायर वर्क' मुळे डोंगराने पेट घेतला. त्यामुळे ज्याने कोणी फायर वर्क केले, त्यांनी आवश्यक काळजी घेतली नाही आणि पर्यावरणप्रेमींनी लावलेली झाडे जळून गेली.

एक लाख ८० हजार किंमतीचे लोखंडी सळई चोरी, भंगार अड्डा चालकासह चार जणांना अटक

एक लाख ८० हजार किंमतीचे लोखंडी सळई चोरीप्रकरणी म्हापसा पोलिसांनी भंगारअड्डा चालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मालक कातळसाब बेपारी (५४, करासवाडा), मांजा लमाणी (३० कुचेली), सुरेंद्र जैसवाल (३२, करासवाडा) आणि शारुन कुमार (२३, कोलवाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी हळर्णकर शिक्षण संस्थे जवळून सळई चोरी केली होती. त्यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तानावडेंकडून मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणालेत की यंदाच्या वर्षी मंत्रिमंडळ फेरबदल पाहायला मिळणार आहेत.

वास्को पेट्रोलपंपवर दुचाकी कलंडली; २ वर्षीय मुलीचा मृत्यू

वास्को येथे पेट्रोलपंपवर एक रेंट अ बाईक कलंडली आणि २ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात आले होते.

Goa Today News Live: हवेत उडवल्या जाणाऱ्या फुग्यांमुळे मांद्रे माळरानाला आग; 3,000 झाडे जळून खाक
Mumbai-Goa Highway Traffic: न्यू ईयरचं सेलिब्रेशन करुन परतणाऱ्या पर्यटकांचा खोळंबा; मुंबई-गोवा महामर्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

डिचोलीत खाणप्रश्नी विशेष बैठक

खाणप्रश्नी मयेतील लोकांची डिचोलीत बैठक. डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत बैठक सुरु. बैठकीच्या सुरवातीलाच शेतकरी, कामगारांचा प्रश्न उपस्थित.

वर्षाच्या पूर्वसंध्येला डिचोलीत घराला आग

लाखेरे, डिचोली येथे मंगळवारी रात्री घराला आग. सुमारे एक लाखांचे नुकसान. सुदैवाने जीवितहानी टळली.

वर्स नवें, नवी उर्बा.... नवीन वर्षाच्या शुभेच्छा

नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीला भरभरून शुभेच्छा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com