Goa News: करसवाडा येथे भीषण अपघात, 4 जण जखमी; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Marathi Breaking News 03 December 2024: सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त, सनबर्न आणि गोव्यातील महत्वाच्या घडामोडी
Goa News: करसवाडा येथे भीषण अपघात, 4 जण जखमी; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
Bambolim Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याला कार्गो आणि क्रूझ हब म्हणून विकसित करण्याची योजना: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

केंद्र सरकार राज्य सरकारच्या समन्वयाने गोव्याला कार्गो आणि क्रूझ हब म्हणून विकसित करत आहे. सागरमाला योजनेअंतर्गत गोव्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनलसह फेरी टर्मिनल उभारण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

फोंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित डिजिटल संग्रहालय तर पर्वरीत टाऊन स्क्वेअर प्रकल्प!

फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत डिजिटल संग्रहालय उभारले जाणार असून यासाठी केंद्रीय पर्यटन खात्याकडून ९७.४७ कोटी रुपयांची मंजूर. तसेच पर्वरीतील टाऊन स्क्वेअर प्रकल्पासाठी ९०.७४ कोटी मंजूर.

हवामान अपडेट: गोव्यात पुन्हा यलो अलर्ट

IMD ने 4 डिसेंबर रोजी गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची दाट शक्यता आहे.

फक्त 'गोंयेचो सायब'च आमच्या 'गोंयेकारपण'ला वाचवू शकतात: विजय सरदेसाई

'गोंयेचो सायब' हे 'गोव्याचे तारणहार' आहेत, अशी श्रद्धा आहे. सरकार राज्यातील शांतता बिघडविण्याचे काम करतंय. गोंयेच्या सायबाने त्यांना माफ करावं, गोव्याला चांगलं भविष्य मिळावं अशी इच्छा विजय सरदेसाईंनी व्यक्त केली.

वाळपई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

फिनिक्स संस्था आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर वाळपई यांच्या संयुक्तपणे रक्तदान शिबिर आयोजित केले. वाळपई मतदार संघातील उसगाव व सत्तरी तालुक्यातील विविध संस्थांनी अनेक वेळा रक्तदान शिबिराव्दारे गरजूंना जीवनदान दिल्याबद्दल गोवा सचिवालय विभागाच्या सचिवांच्या हस्ते सत्कार समारंभ.

सायबाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री जुन्या गोव्यात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तानिमित्त जुन्या गोव्यातील चर्चमध्ये दाखल झाले.

फ्रान्सिस झेव्हियर यांच्या फेस्ताला सुरुवात

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्ताचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो भाविक जुन्या गोव्यात जमले आहेत

करसवाडा येथे भीषण अपघात, 4 जण जखमी

कारसवाडा येथे एका भीषण अपघाताची नोंद झाली. MH नोंदणीकृत वाहन राष्ट्रीय महामार्गावर एका पार्क केलेल्या कंटेनर ट्रकवर आदळले. या अपघातात ७ पैकी ४ जणं जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कंटेनर चालकाने मात्र घटनास्थळावरून पळ काढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com