Goa News: मिकी पाशेको आणि इतर 2 जणांविरुद्ध चार्जशीट,पर्येतील गावकर समाज आणि मुख्यमंत्र्यांची भेट तसेच गोव्यातील ठळक बातम्या

Goa Marathi Breaking News 4 January 2024: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन,पर्यटन यासह संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन सोहळा आणि महत्वाच्या घडामोडी
Goa News: मिकी पाशेको आणि इतर 2 जणांविरुद्ध चार्जशीट,पर्येतील गावकर समाज आणि मुख्यमंत्र्यांची भेट तसेच गोव्यातील ठळक बातम्या
Published on
Updated on

मिकी पाशेको आणि इतर 2 जणांविरुद्ध चार्जशीट

संत फ्रान्सिस झेवियर यांच्यावर सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या अपमानास्पद टिप्पणीच्या निषेधार्थ रस्ता खोळंबवल्या प्रकरणी मिकी पाशेको आणि इतर दोघांवर फातोर्डा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांच्या सांगण्यावरून चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा मिकीचा आरोप आहे.

पर्येतील गावकर समाजाने पुन्हा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पर्ये सत्तरी येथील भुमिका साखळेश्वर देवस्थान संदर्भात गावकर समाजातील लोकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पुन्हा भेट घेतली. उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचे गावकर समाजाची माहिती .

ट्रकमालकही रात्रीच्या खनिज वाहतुकीस अनुत्सुक!

पिळगाव स्थानिकांनी रात्रीची खनिज वाहतूक अडवल्यानंतर डिचोली ट्रकमालक संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. रात्रीची वाहतूक करणे आम्हालाही पटत नाही, खाण खात्याने दिवसा वाहतुकीची वेळ वाढवून देण्याचे निवेदन ट्रकमालकांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

पर्येतील गावकर समाजाने पुन्हा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पर्ये सत्तरी येथील भूमिका साखळेश्वर देवस्थान संदर्भात गावकर समाजातील लोकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पुन्हा भेट घेतली. उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचे गावकर समाजाची माहिती.

केरळमधील हरवलेली मुलं मडगावमध्ये सापडली!

कोकण रेल्वे पोलिसांना मडगाव रेल्वे स्थानकावर केरळमधील त्रिशूर येथील तीन अल्पवयीन मुलं सापडली. हि मुलं २ जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.

..तर खाणीसाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार, 'वेदांता'चे कामगारही आक्रमक

तर खाणीसाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार. वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना भेटणार. 'वेदांता'च्या कामगारांचा निर्धार. खनिज वाहतुकीला विरोध करणाऱ्यांचा केला निषेध.

मोपा विमानतळावर २७ टक्क्यांनी प्रवासी वाढले

उत्तर गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षाच्या तुलनेत पर्यटनाच्या संख्येत वाढ झाली आहे, २०२३च्या तुलनेत २७ टक्के प्रवासी वाढले आहेत.

सायबाच्या अवशेष प्रदर्शन सोहळ्याचा आज अंतिम दिवस

गेल्या ४५ दिवसांपासून जुन्या गोव्यात संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचा प्रदर्शन सोहळा सुरु होता, आज त्याचा अंतिम दिवस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com