Sindhudurg Crime: देवाला तरी सोडा रे...! कणकवलीत दत्त मंदिरातून दत्ताच्या मूर्तीची चोरी

Kankavli Sindhudurg Crime: चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यावेळी त्यांनी गोळ्यानी भरलेले पिस्तूल आणि लोखंडी शस्त्र तिथेच विसरुन गेले होते.
Theft News
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

कणकवली: चोरटे संधी मिळाल्यास कोठून काय चोरी करतील याचा काही नेम नाही. जानवली – कृष्णनगरी येथे असलेल्या दत्त मंदिरातून दत्ताच्या मूर्तीची चोरी झाली. दरम्यान, गुरुवारी (१० जुलै) सकाळी सातच्या सुमारास चोरट्यांनी दत्ताची मूर्ती पुन्हा मंदिराजवळ आणून ठेवली.

मिळालेल्या माहितीनुसार, जानवली – कृष्णनगरी येथील दत्तमंदिराचा दरवाजा कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरात असलेली पिवळसर धातूची दत्ताची मूर्ती चोरी केली. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यावेळी त्यांनी गोळ्यानी भरलेले पिस्तूल आणि लोखंडी शस्त्र तिथेच विसरुन गेले.

Theft News
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गासाठी नवी डेडलाईन; आता मार्च 2026 ला पूर्ण होणार महामार्ग

या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चोरट्यांचा शोध सुरु झाला. दरम्यान, गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी चोरट्यांना सदबुद्धी सुचली आणि त्यांनी पहाटेच्या सुमारास मंदिराजवळच दत्त मूर्ती आणून ठेवली. दत्ताची मूर्ती सोन्याची असावी, अशा उद्देशातून त्याची चोरी झालेली असावी, पण भ्रमनिरास झाल्याने त्यांनी ती परत केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांना मात्र अद्याप चोरटे सापडलेले नाहीत, शस्त्र आणि पिस्तूलच्या मदतीने चोरटे चोरी करण्यास आले होते, यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. पिस्तूलमध्ये गोळ्या असल्याने अधिक चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक देत आहेत. पोलिसांना अद्याप चोरट्यांचा शोध न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com