मराठीचा पोटशूळ, महापालिकेत कन्नड न बोलल्यास बजावली जाणार नोटीस; बेळगावात तुघलकी निर्णय

Belgaum Marathi Dispute: सरकारी आदेशाचे कारण समोर करत व्यावसायिक कारणांसाठी कार्यालयांत कन्नड भाषा अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Karnataka-Marathi language dispute
Belagavi language politicsDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: महाराष्ट्रात मराठी भाषेवरुन वाद उफाळला असताना बेळगावात आता कन्नड अंमलबजावणी प्राधिकरणाला मराठीचा पोटशूळ आला आहे. प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांनी कन्नड न बोलल्यास त्यांना नोटीस बजावली जाईल, असा तुघलकी इशारा दिला आहे. महापालिकेत पार पडलेल्या बैठकीत कन्नड भाषा सक्तीबाबत विविध सूचना करण्यात आल्या.

कन्नड अंमलबजावणी प्राधिकरणाच्या वतीने गुरुवारी (१० जुलै) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कन्नड सक्तीसाठी विविध सूचना करण्यात आल्या. महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी मराठी संवाद साधतात याचा पोटशूळ प्राधिकरणाला आल्याचे दिसते. सरकारी आदेशाचे कारण समोर करत व्यावसायिक कारणांसाठी कार्यालयांत कन्नड भाषा अनिवार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Karnataka-Marathi language dispute
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गासाठी नवी डेडलाईन; आता मार्च 2026 ला पूर्ण होणार महामार्ग

नामफलकांवरील मजूकर देखील ६० टक्के कन्नड भाषेत असावा, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. कार्यालयात कन्नड भाषेचा वापर न केल्यास आणि त्याबाबत नागरिकांकडून तक्रार आल्यास नोटीस बजावण्याचा इशारा देण्यात आला आहे. कन्नडमध्ये नाम फलक नसलेल्या दुकान, स्टॉलचे परवाने रद्द करण्याची सूचना यावेळी देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी सीमाप्रश्न समाप्त झाल्याचे वक्तव्य करुन मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर कडाडी यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र एकीकरण समिती आणि उद्घव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार निषेध करण्यात आला होता. काही राजकीय पक्ष हा मुद्दा जिंवत ठेवण्याचा प्रयत्न करतायेत पण ते देखील अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले होते.

Karnataka-Marathi language dispute
Sindhudurg Crime: देवाला तरी सोडा रे...! कणकवलीत दत्त मंदिरातून दत्ताच्या मूर्तीची चोरी

बेळगावचा मराठी माणूस एवढा स्वाभीमानी आहे की या चळवळीसाठी अजून ७० वर्षे गेली तरी प्राणपणाने लढण्याची आमची तयारी आहे, असे एकीकरण समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले होते. तर, मराठी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सीमाप्रश्न संपलेला नाही. बेळगावातील मराठी माणसाच्या मागे महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे, असे खासदर अरविंद सावंत म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com