तेरा वर्षापूर्वी धोकादायक म्हणून केला होता बंद, कारवार-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पूल अखेर कोसळला

Goa-Karnataka Highway: कारवार आणि गोव्याला जोडणारा हा महत्वाचा पूल मानला जातो. पूल कोसळल्याने दोन्ही राज्यात जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय.
तेरा वर्षापूर्वी धोकादायक म्हणून केला होता बंद, कारवार-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पूल अखेर कोसळला
Collapsed Part of Goa-Karnataka HighwayPTI
Published on
Updated on

पणजी: कारवार - गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर कोडीबाग येथे काळी नदीवर असलेला 41 वर्षे जुना पूल कोसळला. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी पुलावरुन जाणारी तामिळनाडू येथील लॉरी देखील पाण्यात नदीत कोसळली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी नदीत पडलेल्या चालकाला वाचवण्यात यश आले.

कारवार आणि गोव्याला जोडणारा हा महत्वाचा पूल मानला जातो. पूल कोसळल्याने दोन्ही राज्यात जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय.

दरम्यान, हा पूल जिल्हा प्रशासनाने धोकादायक ठरवून 2011 मध्येच वाहतुकीसाठी बंद केला होता. कोणत्याही क्षणी कोसळू शकतो या भीतीने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण, स्थानिकांनी पूल बंद करण्यास विरोध केल्याने किरकोळ दुरुस्ती करुन पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पूल वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने सांगितले होते. दुरुस्ती करण्यासाठी नेमण्यात आलेल्या टीमकडून पूल फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. अरबी समुद्र आणि काळी नदीच्या संगमावर हा पूल उभा असून, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. १९८२ मध्ये उभारण्यात आलेला पूल बांधकामावेळी देखील कोसळला होता.

तेरा वर्षापूर्वी धोकादायक म्हणून केला होता बंद, कारवार-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पूल अखेर कोसळला
गोवा सरकारमधील मंत्र्याचा दबाव? सनबर्नसाठी दक्षिणेतील गावाचा पुढाकार, विशेष ग्रामसभेचे आयोजन

रात्री सव्वा एक वाजता झालेल्या अपघातानंतर पूल तीन भागात तुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी पूलावरून जात असलेली लॉरी पूलासह नदीत कोसळली. नदीत कोसळलेल्या लॉरीतील चालकाला यावेळी जवळच असणाऱ्या मच्छीमारांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. चालकाला गंभीर जखम झाली असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग 66 चे रुंदीकरण करण्यात आले त्यावेळी उभारण्यात आलेल्या शेजारील पुलामुळे हलक्या वाहनांच्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला नसल्याची माहिती आहे. नव्या पुलाच्या फिटनेसबाबत देखील अहवाल देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने आयआरबीकडे केली आहे. सध्या पुलावरुन जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आलीय.

कारवार आणि गोव्याला जाण्यासाठी वाहनांना आता मलप्पुरम कटरा मार्गे वळसा घालून जावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com