Goa Politics: कोणाला डच्चू? कोणाला लॉटरी? CM सावंत, आरोग्यमंत्री राणे दिल्लीत; मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता

Goa Cabinet Reshuffle: डॉ. प्रमोद सावंत यांचा दिल्ली दौरा केवळ प्रशासकीय नसून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठीही तो असल्याचे बोलले जात आहे.
Goa CM Dr. Pramod Sawant Meets Central for Commerce & Industry Minister Piyush Goyal
Goa CM Dr. Sawant Meets Minister Piyush GoyalX Handle
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यात राजकीय चर्चाना पुन्हा ऊत आला आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता असल्याने कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाला लॉटरी लागणार, याबाबतच्या चर्चा ऐकू येत आहेत.

विशेष म्हणजे, गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गावडे हे काही काळापासून वादग्रस्त विधानांबाबत चर्चेत होते. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे.

Goa CM Dr. Pramod Sawant Meets Central for Commerce & Industry Minister Piyush Goyal
Goa Crime: धारगळ ॲसिड हल्ला प्रकरण! संशयिताला महाराष्ट्रातून अटक; प्रेमप्रकरणातून हल्ला झाल्याचा संशय

राजनाथ सिंह यांचीही घेतली भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची देखील भेट घेतली. पणजीतील सैनिकी आणि दंत रुग्णालयाचे स्थलांतर, राज्यात एक सैनिकी शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव आणि गोव्यात हेमरु युनिट सुरु करण्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Goa CM Dr. Pramod Sawant Meets Central for Commerce & Industry Minister Piyush Goyal
Ponda: केरये खांडेपार येथे नदीत उडी घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

डॉ. प्रमोद सावंत यांचा दिल्ली दौरा केवळ प्रशासकीय नसून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठीही तो असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये मंत्रिमंडळ फेरबदल, आगामी स्थानिक निवडणुकांची तयारी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर तोडगा काढण्याचे मुद्दे चर्चेचे केंद्रबिंदू असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com