

डिचोली: समाधानकारक पीक आले असतानाही यंदा गावठी लाल मिरची ‘तिखट’ होण्याचे संकेत मिळत आहेत. यंदा पिकलेल्या गावठी लाल मिरचीची आता डिचोलीच्या बाजारात आवक व्हायला सुरवात झाली असून, ही मिरची सध्या तरी भाव खात आहे.
बुधवारी (ता.२३) आठवडी बाजाराच्या दिवशी डिचोलीत प्रचंड प्रमाणात नसली, तरी गावठी लाल मिरचीची आवक झाली होती. मये आणि मेणकुरे भागातून गावठी लाल मिरची विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाली होती.
मात्र, गावठी मिरची यंदा महाग झाल्याचे दिसून येत होते. बाराशे रुपये किलो, असा स्वच्छ न केलेल्या (देठ न काढलेल्या) मिरचीचा भाव होता. त्यामुळे आठवडी बाजारात या मिरचीला मागणी कमी होती. पुढील काही दिवसांत बाजारात गावठी मिरचीची आवक वाढणार असून, मिरची स्वस्त होणार, अशी ग्राहकांना आशा आहे.
गेल्या वर्षी गावठी लाल मिरचीचा दर ८०० रुपये प्रतिकिलो असा होता. बहुतेक गृहिणींची गावठी मिरचीला पसंती असते. यंदा मात्र गावठी मिरचीचे दर ऐकताच गृहिणींसह ग्राहकांच्या कपाळावर आट्या पडत आहेत.
काश्मिरी मिरची ५५० रुपये किलो!
गावठी लाल मिरचीपाठोपाठ बहुतेक ग्राहक कर्नाटकातील जांबोटी आणि महाराष्ट्रातील बांदा भागातील लाल मिरचीला पसंती देतात. सध्यातरी अपेक्षेप्रमाणे या मिरचीची आवक झालेली नाही.
सध्या गुट्टूर, बेडगी आणि काश्मिरी जातीची मिरची बाजारात प्रचंड प्रमाणात येऊ लागली आहे. गुट्टूर-२२०, बेडगी-३५० तर काश्मिरी- ५५० रुपये किलो असा या मिरचीचा भाव आहे. विशेषकरून परप्रांतीय या मिरचीला पसंती देतात. त्यामुळे या मिरचीला बाजारात मागणी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.