Girish Chodankar: जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

चोडणकर: मुख्यमंत्र्यांनी खंवटेंना मंत्रिमंडळातून काढून टाकावे
Girish Chodankar
Girish Chodankar Dainik Gomantak

Girish Chodankar: पर्वरी येथील गुन्हेगारी घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्याचे सांगत, खून, जमीन बळकावणे, सरपंचाला धमकावण्यासाठी पोलिस-राजकारणी संगनमत, सेरुला कोमुनिदाद घोटाळा आणि अन्य प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

Girish Chodankar
Goa Taxi App: सरकारने चालकांवर ‘टॅक्सी अॅप’ लादले!

ते म्हणाले, मी यापूर्वी पर्वरीचे आमदार, मंत्री रोहन खंवटे यांना काही प्रश्न जाहीरपणे विचारले, त्याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. त्यांचे मौन बोलके असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि चौकशी सुरू करावी. दरम्यान, खंवटे यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

चोडणकर म्हणाले, मंत्री खंवटे यांनी माझी सोडियम पातळी तपासण्याचा सल्ला दिला, त्यानुसार मी तपासणी करून घेतली आहे. अहवाल सकारात्मक असल्याने मी विचारलेले प्रश्न आता तरी गांभीर्याने घेऊन त्यांनी उत्तरे द्यावीत.

गोव्यात काय चालले आहे?’ तुम्ही वकिलाशी असे कसे वागू शकता? वकिलाला मारहाण झाल्यास बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार करण्याचे धाडस कोणी करणार नाही. उद्या ते आपल्यावरही (न्यायाधीशांवर) हल्ला करू शकतात. कोणीही सुरक्षित राहणार नाही, हे निरीक्षण जॉन मिनेझिसच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने नोंदवले होते, ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते आणि जेव्हा त्यांचे वकील ओलाव अल्बुकर्क हे पाहणीसाठी आले, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

दोषींवर कारवाईची मागणी करण्याऐवजी, खंवटे यांनी पोलिसांवर मोर्चा काढला आणि अल्बुकर्कला अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. आणखीन एका प्रकरणात सरपंचाला धमकी देणाऱ्या पोलिसांनी खंवटे यांचे नाव घेतले असून, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

‘पर्वरी फाईल’ चित्रपट...

चोडणकर म्हणाले, पर्वरी येथे अनेक प्रकरणे आणि घटना आहेत,ज्यांची चौकशी व्हायला हवी. पंचायतीच्या राजकारणावरून सरपंचाला धमकावण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. आवाज उठवल्याबद्दल आरटीआय कार्यकर्त्याची कथितपणे हत्या केली जात आहे आणि जमीन बळकावण्याचे घोटाळे होत आहेत. या सगळ्याची एकतर सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हायला हवी. तेथील गुन्हेगारीवर ‘पर्वरी फाईल’ हा एक चांगला चित्रपट बनू शकतो. या माध्यमातून सत्तेत असलेले राजकारणी सत्तेचा वापर करून लोकांमध्ये भीती कशी निर्माण करत आहेत आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये कसे गुंतलेले असतात, हे समोर आणू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com