Hyderabad Chess Tournament: अमेय अवदीचा चमकदार खेळ! आंतरराष्ट्रीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत छाप; 7 विजय व एका बरोबरीची नोंद

Ameya Audi Chess: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने हैदराबादमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडताना सहाव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
Ameya Audi Chess Goa
Ameya Audi GoaX
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने हैदराबादमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडताना सहाव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. या स्पर्धेत त्याला २१वे मानांकन होते. त्याने चमकदार खेळ करताना मानांकित ग्रँडमास्टर-आयएम खेळाडूंच्या तुलनेत सरस कामगिरी केली.

अमेयने महाराष्ट्राचा ग्रँडमास्टर द्वितीय मानांकित अभिमन्यू पुराणिक याला पराभूत केले, तर रशियन ग्रँडमास्टर आठवा मानांकित बोरिस सावचेंको याला बरोबरीत रोखले. याशिवाय अमेयने आयएम दुष्यंत शर्मा, फिडे मास्टर जे. रामकृष्ण, शेख सुमेर अर्श यांना नमविले.

Ameya Audi Chess Goa
Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

एकूण नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत अमेयने सात विजय व एका बरोबरीची नोंद करताना साडेसात गुणांची कमाई केली. संयुक्त चौथे स्थान मिळालेल्या ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्ती, ग्रँडमास्टर एम. प्रज्ञेश व अमेय यांचे समान साडेसा गुण झाले. टायब्रेकर गुणांत त्यांना अनुक्रमे चौथा, पाचवा व सहावा क्रमांक मिळाला.

Ameya Audi Chess Goa
Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

ग्रँडमास्टर पीए इनियान याला विजेतपद मिळाले. ग्रँडमास्टर मित्रभा गुहा याला द्वितीय, तर ग्रँडमास्टर ए. हरिकृष्ण याला तृतीय क्रमांक मिळाला. त्यांचे समान आठ गुण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Durand Cup Football Tournament 2026
Goa Under 19 Cricket Team
 Ethan Vaz Grandmaster
Goa Table Tennis Tournament
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com