Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

Goa Taxi Aggregator: वाहतूक खात्‍याने ॲग्रीगेटर धोरणासंदर्भातील मसुदा सूचना आणि हरकतींसाठी खुला करून त्‍यात बदलही केले. पण, आता पायलट संघटनेने ॲग्रीगेटर धोरणाला विरोध करण्‍यास सुरुवात केली आहे.
Goa motorcycle pilots
Goa motorcycle pilotsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्‍यात टॅक्‍सी ॲग्रीगेटरची संख्‍या वाढल्‍यास त्‍याचा मोठा परिणाम राज्‍यातील पारंपरिक मोटार सायकल पायलटांना बसणार आहे. अशा कंपन्‍या राज्‍यात आल्‍यानंतर पायलटांचे व्‍यवसाय बंद पडणार आहेत. त्‍यामुळे सरकारने याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी मोटार सायकल पायलट संघटनेचे अध्‍यक्ष सुरेश ठाकूर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.

राज्‍यात टॅक्‍सी ॲग्रीगेटर आणण्‍याचा निर्णय सरकारने घेतल्‍यानंतर यावरून स्‍थानिक टॅक्‍सी मालकांनी आंदोलन छेडले. इतर राज्‍यांतील टॅक्‍सी ॲग्रीगेटर आणून स्‍थानिकांचा टॅक्‍सी व्‍यवसाय बंद पाडण्‍याचा सरकारचा डाव असल्‍याचा आरोपही त्‍यांनी सुरू केला.

त्‍यानंतर वाहतूक खात्‍याने ॲग्रीगेटर धोरणासंदर्भातील मसुदा सूचना आणि हरकतींसाठी खुला करून त्‍यात बदलही केले. पण, आता मोटार सायकल पायलट संघटनेने ॲग्रीगेटर धोरणाला विरोध करण्‍यास सुरुवात केली आहे.

Goa motorcycle pilots
Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

गोव्‍याला स्‍वयंपूर्ण करण्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. इतर राज्‍यांतील ॲग्रीगेटर कंपन्‍या गोव्‍यात आल्‍यानंतर स्‍थानिकांना निश्‍चित फटका बसेल,असे ठाकूर म्हणाले.

Goa motorcycle pilots
Goa Taxi Aggregator Issue: ट्रान्सपोर्ट अ‍ॅग्रीगेटर प्रश्नाचे CM सावंत यांनी एका ओळीत मराठीतून दिले उत्तर; वाचा काय म्हणाले?

प्रलंबित मागण्‍या सोडवा!

मोटार सायकल पायलटांच्‍या अनेक मागण्‍या सरकार दरबारी पडून आहेत. पायलटांचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास देण्‍यात येणारी तीन लाखांची जीवनदायिनी विमा योजना अनेक वर्षांपासून बंद आहे. ६४ स्‍टँडचा विषयही सरकारने अजून सोडवलेला नाही. याबाबत येत्‍या पावसाळी अधिवेशनात चर्चा होऊन आमचे प्रश्‍न सुटणे आवश्‍यक आहे, असेही सुरेश ठाकूर यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com