Goa Single Use Plastic Ban: गोव्यात अस्‍वच्‍छतेच्या प्रमाणात वाढ; सिंगल यूज प्‍लास्‍टिकबंदी कागदावरच!

त्रणा सुस्‍तावल्‍या : ‘प्रदूषण नियंत्रण’ने आकारला केवळ 1 लाख 10 हजारांचा दंड
 Plastic Ban | Goa News
Plastic Ban | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

Goa Single Use Plastic Ban: गोव्यात सिंगल यूज प्‍लास्‍टिकच्‍या वापरावरील बंदी केवळ कागदावर राहिली आहे. त्‍याचा बाजारपेठांत सर्रास वापर होत असून, त्‍यावर नियंत्रण ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा काणाडोळा करत आहेत.

गेल्‍या काही महिन्‍यांत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईअंतर्गत 1 लाख 10 हजारांची रक्कम जमा केली आहे. अर्थात सदर दंड रक्‍कम पाहता कारवाई अत्‍यंत नगण्‍य ठरते.

गोवा हे निसर्ग सौंदर्यासाठी ख्‍यातकीर्त आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने परिसर प्‍लास्‍टिकमुक्‍त ठेवण्‍याची जबाबदारी पंचायती आणि पालिकांची आहे.

मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. परिणामी गोव्यात अस्‍वच्‍छतेचे प्रमाण वाढत असून, प्लास्टिक कचऱ्यात वाढ झाली आहे. सिंगल यूज प्लास्टिक ही गंभीर समस्या बनू लागली आहे. त्यामुळे नाले तुंबणे, जमीन नापिक बनणे आदी पर्यावरणाची हानी होत आहे.

 Plastic Ban | Goa News
Green Tea on Empty Stomach: सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे किती योग्य? वाचा हेल्थ एक्सपर्टचे मत

असा आहे नियम व शिक्षा... ..

गेल्‍या वर्षी 1 जुलैपासून देशभरात 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लास्‍टिकवर बंदी घालण्‍यात आली आहे. अशा प्रकारच्‍या प्‍लास्‍टिकच्‍या वस्‍तू एकदा वापरून सर्रास फेकून दिल्‍या जातात.

म्‍हणून त्‍यांना सिंगल यूज म्‍हटले जाते. प्‍लास्‍टिकच्‍या 19 वस्‍तू नक्‍की करण्‍यात आल्‍या, ज्‍याचा वापर केल्‍यास वर्षाचा तुरुंगवास किंवा लाख रुपये दंड होऊ शकतो.

 Plastic Ban | Goa News
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडे दिल्लीला रवाना; जेपी नड्डांसोबत मंत्रिमंडळ फेरबदलावर होणार चर्चा?

पंचायतींना अधिकार

‘प्रदूषण नियंत्रण’ने काही महिन्‍यांत दंडापोटी केवळ 1 लाख 10 हजार रुपये जमा केले आहेत. पणजी, म्हापसा, पर्वरी, कळंगुट, मडगाव, कुंकळ्ळी, कुडचडे भागात आतापर्यंत छापे टाकले आहेत.

पंचायतींनीही त्यांच्या अधिकारक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात नियंत्रण ठेवावे आणि कारवाई करावी, अशा सूचना केल्‍या आहेत. पालिका आणि पंचायतींना प्रति व्यक्ती 2500 रुपये दंड आकारण्याचा आणि एकल वापराचे प्लास्टिक जप्त करण्याचा अधिकार आहे.

 Plastic Ban | Goa News
Paneer Corn Chilli Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा पनीर कॉर्न चिली, दिवसभर राहाल एनर्जेटिक

‘प्रदूषण नियंत्रण’ने काय प्रयत्‍न केले?

कमी मायक्रॉनच्‍या प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मंडळाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत, नगरपालिका, गटविकास अधिकारी यांच्यासोबत नियमित बैठका होतात.

सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जागृती करण्यासाठी मंडळाने रेडिओ, वर्तमानपत्रे आणि मल्टिमीडिया प्लॅटफॉर्मवर खास मोहीम राबवली.

कारवाईसाठी 25 अधिकाऱ्यांचा समूह तयार करण्‍यात आला आहे. संबंधित अधिकारी राज्‍यभर दुकाने, आस्‍थापनांची तपासणी करतात.

राज्यात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी आहे. आम्ही विविध आस्‍थापनांत नियमित तपासणी करतो व कठोर कारवाई करतो.

महेश पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com