Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचा मुद्दा बऱ्याच कालावधीपासून सुरू असून यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि सदानंद तानावडे हे जेपी नड्डांशी राज्यसभेची जागा तसेच मंत्रिमंडळातील फेरबदल करण्याच्या निर्णयावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर हे बदल होतील, अशीही चर्चा होती. मात्र ती सत्यात उतरताना दिसत नाही.
याबाबत काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी विधान केले होते. ते म्हणाले होते की, मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे किंवा नाही, हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. तेच याबाबत निर्णय घेतील. पक्ष केवळ पक्षाचे मत कळवू शकतो आणि तशी विचारणा झाल्यास मुख्यमंत्र्यांना पक्षाचे मत कळवू, असेही ते म्हणाले होते.
दिल्लीमधील या भेटीनंतर याबाबत नेमका काय निर्णय होणार यावर अनेकांचे भविष्य अवलंबून असून याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.