Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

colvale central jail goa human rights commission: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आरोग्याची आणि मूलभूत सुविधांची हेळसांड होत असल्याचे गोवा मानवाधिकार आयोगाच्या पाहणीत उघड झाले आहे.
colvale central jail goa human rights commission
Colvale Central JailDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आरोग्याची आणि मूलभूत सुविधांची हेळसांड होत असल्याचे गोवा मानवाधिकार आयोगाच्या पाहणीत उघड झाले आहे. आयोगाने १३ ऑक्टोबर रोजी अचानक पाहणी करून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती भरत देशपांडे, सदस्य डेसमंड डिकॉस्टा आणि प्रमोद कामत यांच्या पथकाने कारागृहातील सुविधांची पाहणी केली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे एका कैद्याला तब्बल ४५ दिवस मिळाली नसल्याचे आढळले. आयोगाने तातडीने औषधे पुरवण्याचे निर्देश दिले.

कैद्यांना देण्यात येणारी अंडी आणि केळी १५ दिवसांपेक्षा जुनी असल्याचे तसेच अंड्यांना दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. ताजी अंडी आठवड्यातून किमान दोनदा खरेदी करण्यास सांगण्यात आले. सांडपाण्याची गटारे तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक खोल्यांतील डासप्रतिबंधक जाळ्या तुटलेल्या आहेत. पाण्याच्या टाकीतील खराब व्हॉल्व्हमुळे पाण्याची नासाडी होत असल्याचेही आढळले. देखभालीसाठी कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी नेमण्यासह वॉटर सेन्सर बसवण्याचे निर्देश आयोगाने दिले.

colvale central jail goa human rights commission
Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

दोन कैद्यांसाठी असलेल्या खोल्यांत तिघांना ठेवण्यात येत असून, स्वयंपाकघरातील वायुवीजन आणि पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरण यंत्रणेच्या देखभालीचे प्रश्नही समोर आले. मानसिक आरोग्यासाठी (Health) डॉक्टरांच्या नियमित भेटींची शिफारस करण्यात आली आहे. पाहणी अहवालावरील कारवाईचा अहवाल २३ डिसेंबर २०२६ पूर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जामीन मिळूनही १९ कैदी तुरुंगात!

जामिनाची रक्कम भरण्याची आर्थिक क्षमता नसल्याने १९ कैदी तुरुंगात आहेत. त्यांच्या प्रकरणांकडे सहानुभूतीने पाहण्याची विनंती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना करण्याचे आयोगाने ठरवले आहे.

colvale central jail goa human rights commission
Colvale Jail Threat Video: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

कैदी फातिमाला हवा फोन!

बांगलादेशी कैदी फातिमा खातून हिने आंतरराष्ट्रीय फोनची मागणी केली; मात्र ई-मुलाकातचा पर्याय नाकारला. कायद्याच्या चौकटीत तिच्या मागणीवर तोडगा शोधण्याची सूचना आयोगाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com