Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Colvale Jail Prisoner Threat: एका व्यक्तीला कथित व्हिडिओ कॉल करून सुरा दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाने तातडीने कोलवाळ पोलिसांशी संपर्क साधला.
Colvale Jail Prisoner Threat
Colvale Jail ThreatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील एका खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याने बाहेर एका व्यक्तीला कथित व्हिडिओ कॉल करून सुरा दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाने तातडीने कोलवाळ पोलिसांशी संपर्क साधला. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी कारागृहाच्या ‘हाय-सिक्युरिटी’ ब्लॉकची तपासणी केली. मात्र या झडतीत कोणताही मोबाईल, चार्जर किंवा सुरा पोलिसांच्या हाती लागला नाही, असे कारागृह सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील एका कैद्याने व्हिडिओ कॉलद्वारे धमकी दिल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भातील माहिती कारागृह प्रशासनपर्यंत पोहोचताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोलवाळ पोलिसांना कारागृहाची तपासणी करण्याची सूचना दिली. त्यानंतर काल बुधवारी (ता.३० सप्टेंबर) कोलवाळ पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरक्षा कर्मचाऱ्यांसह कारागृहाच्या संबंधित उच्च सुरक्षा कक्षाची तपासणी केली.

Colvale Jail Prisoner Threat
Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

सोशल मीडियावर या झडतीदरम्यान मोबाईल जप्त केल्याची चर्चा सुरू असली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांना तपासणीदरम्यान कोणताही मोबाईल, चार्जर अथवा आक्षेपार्ह शस्त्र आढळलेले नाही. केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही शोधमोहीम राबवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com